Delhi Capitals | WPL 2024 X/wplt20
क्रीडा

WPL 2024, GG vs DC: दिल्ली कॅपिटल्सने मारलं बंगळुरूचं मैदान! गुजरातचा सलग चौथा पराभव

Gujarat Giants vs Delhi Capitals: वूमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सला पराभूत करत दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals won against Gujarat Giants in 10th match of WPL 2024

वूमन्स प्रीमियर लीग 2024 मधील 10 वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. बंगळुरूमध्ये झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 25 धावांनी विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय आहे. मात्र, गुजरातला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे.

दिल्लीने या सामन्यात गुजरातसमोर विजयासाठी 164 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजराजला 20 षटकात 8 बाद 138 धावाच करता आल्या.

दिल्लीने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली होती. पहिलेच षटकात दिल्लीच्या तितास साधूने निर्धाव टाकले, तर दुसऱ्याच षटकात शिखा पांडेने लॉरा वोल्वार्डला शुन्यावर बाद केले.

त्यानंतर फोबी लिचफिल्डने कर्णधार बेथ मुनीला साथ देताना काही आक्रमक फटके खेळले. परंतु, पाचव्या षटकात जेस जोनासनने गुजरातला दोन मोठे धक्के दिले. तिने बेन मुनीपाठोपाठ (12) लिचफिल्डलाही (15) बाद केले. आठव्या षटकात वेदा कृष्णमुर्तीही 12 धावांवर बाद झाली.

यानंतर मात्र ऍश्ले गार्डनरने डाव सांभाळला. तिने आक्रमक खेळताना गुजरातला 100 धावांचा टप्पा पार करून दिला होता. परंतु, तिला 15 व्या षटकात जोनासननेच बाद केले. गार्डनरने 31 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर मात्र गुजरातच्या खालच्या फळीला फार काही करता आले नाही. त्यामुळे गुजरातला 138 धावांपर्यंतच पोहचता आले.

दिल्लीकडून जेस जोनासन आणि राधा यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कर्णधार मेग लॅनिंग आणि शफली वर्मा यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. शफालीने एक चौकार आणि एक षटकारही ठोकला. परंतु, ती 13 धावांवर बाद झाली.

नंतर एलिस कॅप्सीने लॅनिंगची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र शफालीपाठोपाठ मेघना सिंगनेच कॅप्सीचाही (27) अडथळा दूर केला. यानंतर मात्र लॅनिंगने मधल्या षटकात आक्रमक पवित्रा घेतला. तिने काही आक्रमक शॉट्स खेळत 39 चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर 13 व्या षटकात मेघनानेच लॅनिंगला बाद केले.

लॅनिंगने 41 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 55 धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात जेमिमा रोड्रिग्जने अवघ्या 7 धावांवर विकेट्स गमावली. पण तिने लॅनिंगसह 47 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे दिल्लीला 100 धावांचा टप्पा सहज पार करता आला.

त्यानंतर मात्र अखेरच्या सात षटकात ऍनाबेल सदरलँड (20), जेस जोनासन (11), अरुंधती रेड्डी (5) आणि राधा यादव (5) यांच्या विकेट्स स्वस्तात गेल्या. अखेरीस शिखा पांडे 14 धावांवर नाबाद राहिली. त्यामुळे दिल्लीने 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या.

गुजरातकडून मेघना सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ऍश्ले गार्डनरने 2 विकेट्स घेतल्या, तर तनुजा कन्वर आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT