WPL 2024: चिन्नास्वामीवर आरसीबीचं मुंबईपुढे लोटांगण... स्मृतीची टीम 7 विकेट्सनी हारली

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या.
Amelia Kerr
Amelia Kerr Dainik Gomantak
Published on
Updated on

WPL 2024 Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: महिला प्रीमियर लीग 2024 मधील नववा सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या. मात्र, आरसीबीने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने शानदार विजय नोंदवला. मुंबईने आरसीबीचा 7 विकेट्सनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात खेळत नव्हती. एकीकडे गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला होता, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा यूपी वॉरियर्सकडून पराभव झाला होता.

दरम्यान, आरसीबीने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका भाटियाच्या रुपाने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. 15 चेंडूत 31 धावांची तूफानी खेळी खेळून ती बाद झाली. पहिल्या विकेटसाठी नेट सिव्हर ब्रंट आणि यस्तिका यांच्यात 23 चेंडूत 45 धावांची भागीदारी झाली. जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारी हेली मॅथ्यूज 26 धावा करुन बाद झाली. यादरम्यान तिच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकार आला.

अमेलिया आणि ब्रंट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 (35) धावांची भागीदारी केली. अमेलिया कर 40 धांवाची शानदार खेळी खेळून नाबाद राहिली. विशेष म्हणजे, अमेलिया करच्या झंझावाती खेळीच्या जोरावर एमआयने आरसीबीचा 29 चेंडू राखून पराभव केला.

आरसीबीकडून जॉर्जिया वेयरहम, श्रेयंका पाटील आणि सोफी डिव्हाइन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या मोसमात मुंबईचा आरसीबीविरुद्धचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी, गेल्या मोसमात मुंबईने आरसीबीला दोनदा पराभूत केले होते. त्याचवेळी, आरसीबीचा या मोसमातील हा दुसरा पराभव आहे.

Amelia Kerr
WPL 2024: ग्रेस हॅरिसची तूफानी खेळी; यूपी वॉरियर्सकडून गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सनी पराभव

आरसीबीचा डाव

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखालील आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या. यादरम्यान ॲलिस पेरी आणि जॉर्जिया वेयरहम यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली होती. मात्र, मुंबईविरुद्ध आरसीबीची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीवीर कर्णधार स्मृती मानधना नऊ धावा करुन बाद झाली.

संघाला दुसरा धक्का तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सबिनेनी मेघनाच्या रुपाने बसला आणि तिला 11 धावा करता आल्या. तिसरा फटका सोफी डिव्हाइनच्या रुपाने बसला, जिला 10 चेंडूत 9 धावा करता आल्या. या सामन्यात ऋचा घोषने सात धावा, सोफी मोलिनेक्सने 12 धावा आणि जॉर्जिया वेयरहमने 27 धावा केल्या.

ॲलिस पेरी 38 चेंडूत 44 आणि श्रेयंका पाटील पाच चेंडूत 7 धावा करुन नाबाद राहिली. मुंबईकडून नेट सिव्हर ब्रंट आणि पूजा वस्त्रकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इसी वोंग आणि सायका इशाक यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com