Delhi Capitals  Dainik Gomantak
क्रीडा

DCW Vs UPW: यूपी वॉरियर्सला हारवून दिल्ली कॅपिटल्सची थेट फायनलमध्ये धडक

WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दिल्लीच्या गोलंदाजांनी यूपीला मोठी धावसंख्या करु दिली नाही आणि पूर्ण 20 षटके खेळल्यानंतर हा संघ सहा विकेट गमावून केवळ 138 धावा करु शकला.

यानंतर दिल्लीने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 17.5 षटकांत पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे, दिल्लीने हा सामना जिंकून थेट फायनलसाठी क्वालिफाय केले आहे.

लॅनिंग-शफालीची शानदार खेळी

दिल्लीला विजयासाठी 139 धावा करायच्या होत्या. दिल्लीला चांगली सुरुवात हवी होती, जी त्यांना मिळाली. मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली.

शफाली 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करुन बाद झाली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (3 धावा) एकूण 67 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर लॅनिंगही एकूण 70 धावांवर बाद झाली. तिने 23 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.

अशी यूपीची फलंदाजी होती

कर्णधार अॅलिसा हिली आणि श्वेता सेहरावत यांनी यूपीला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा काढल्या.

श्वेता 19 धावा करुन बाद झाली. परंतु हिलीने आपली शानदार खेळी सुरुच ठेवली आणि धावा काढत राहिली. तिने 34 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. 63 धावांवर तिची विकेट पडली.

यानंतर, सिमरन शेख केवळ 11 धावा करुन बाद झाली पण तालिया मॅकग्राने आघाडी घेत वेगवान धावा केल्या. तिने शानदार अर्धशतक झळकावले आणि त्यामुळेच यूपीचा संघ आपेक्षित धावसंख्या गाठू शकला.

मॅकग्राने 32 चेंडूंचा सामना करत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तिला शेवटच्या फळीत इतर कोणतीही फलंदाज साथ देऊ शकली नाही.

तसेच, किरण नवगिरे दोन, दीप्ती शर्मा तीन, सोफी एक्लेस्टोन खाते न उघडता आऊट झाली. मॅकग्रा नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) एलिसा कॅप्सीने तीन बळी घेतले. राधा यादवने दोन गडी बाद केले. त्याचबरोबर, जेस जोनासेनला एक विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT