Delhi capital Dainik Gomantak
क्रीडा

IPL: दिल्ली कॅपिटल्स संघाला दुहेरी फटका

कर्णधार ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाला गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 हंगामात दुहेरी फटका बसला. प्रथम दिल्लीला लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) 6 विकेट्सने पराभूत केले. यानंतर स्लोओव्हर रेटमुळे संघाला दंडही ठोठावण्यात आला. (Delhi capital captain Rishabh Pant fined for maintaining slow over rate)

मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर, संघाला हंगामात प्रथमच आयपीएलच्या (IPL) आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटसाठी दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रोहित आणि विल्यमसनलाही दंड ठोठावण्यात आला
आयपीएल हंगामात 7 एप्रिलपर्यंत 15 सामने खेळले गेले. यादरम्यान ऋषभ पंत हा तिसरा कर्णधार आहे, ज्याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. मोसमाच्या सुरुवातीला, दिल्ली आणि मुंबई इंडियन्सचा (MI) पहिला सामना 27 मार्च रोजी झाला होता. त्यादरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनलाही 30 मार्च रोजी दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर हैदराबादला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

स्लो ओव्हर रेटमध्ये कर्णधाराला दंड होतो
नियमानुसार एखाद्या संघाने स्लो ओव्हर रेट केल्यास कर्णधाराला दंड होतो. अशा स्थितीत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यांना प्रत्येकी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तिन्ही सामन्यांमध्ये या कर्णधारांना पराभवानंतर या दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागले. सामन्यादरम्यान, सर्व संघांना त्यांच्या कोट्यातील 20 षटके निर्धारित वेळेत पूर्ण करायची असतात. तसे न केल्यास स्लो ओव्हर रेट अंतर्गत दंड आकारला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT