भारतीय युवा फुटबॉलपटूंना इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी, गोव्यात युवा संघांची स्पर्धा

रिलायन्स फौंडेशन डेव्हलपमेंट लीगमधील पहिले दोन संघ ठरणार पात्र, स्पर्धा 15 पासून गोव्यात
Opportunity for young Indian footballers to play in England
Opportunity for young Indian footballers to play in EnglandDainik Gomantak

पणजी : रिलायन्स फौंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिले दोन संघ इंग्लंडमधील प्रीमियर लीग क्लब अकादमी संघाविरुद्ध खेळण्यास पात्र ठरणार आहेत. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेतील सात आणि रिलायन्स फौंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) मिळून आठ युवा संघांची स्पर्धा गोव्यात 15 एप्रिल ते 12 मे या कालावधीत खेळली जाईल.  

‘‘भारतीय फुटबॉलची क्षमता प्रदर्शित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,’’ असे रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापक व अध्यक्ष नीता अंबानी यांनी या स्पर्धेविषयी सांगितले. आठही संघात देशातील सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटूंचा सहभाग असेल. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे.

आयएसएल (ISL) स्पर्धेतील अकरापैकी बंगळूर एफसी, चेन्नईयीन एफसी, एफसी गोवा, जमशेदपूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, मुंबई सिटी व हैदराबाद एफसी या सात संघांचे युवा संघ स्पर्धेत खेळतील.

Opportunity for young Indian footballers to play in England
'...त्यामुळे 40 टक्के कमी दरात गॅस उपलब्ध होणार'

इंग्लंडमध्ये या वर्षी युवा खेळाडूंची नेक्‍स्ट जन कप स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत रिलायन्स फौंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिले दोन संघ खेळतील. आयएसएल आणि प्रीमियर लीग यांच्यातील दीर्घकालीन करारांतर्गत भारतीय युवा संघांना इंग्लंडमधील स्पर्धेत संधी मिळेल. ‘‘ही लीग म्हणजे भारतातील अफाट फुटबॉल गुणवत्ता विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाची वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने हे आणखी एक पाऊल,’’ असे नीता अंबानी यांनी नमूद केले.

सर्व संघांत भारतीय खेळाडू

रिलायन्स फौंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत 1 जानेवारी 2001 रोजी किंवा नंतर जन्मलेल्या खेळाडूंना खेळता येईल. त्यात 1 जानेवारी 1999 रोजी किंवा नंतर जन्मलेल्या पाच खेळाडूंचा समावेश करता येईल. या पाच खेळाडूंपैकी फक्त तिघांना अंतिम अकरा सदस्यीय संघात खेळण्याची परवानगती असेल. प्रत्येक संघात 24 भारतीय खेळाडू असतील आणि परदेशी खेळाडूंचा संघात समावेश करता येणार नाही. स्पर्धा एकेरी साखळी पद्धतीने खेळली जाईल. प्रत्येक संघ साखळी फेरीत सात सामने खेळेल. सर्व सामने दक्षिण गोव्यातील दोन मैदानावर खेळले जातील. संघ 12 एप्रिलपर्यंत गोव्यात दाखल होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com