Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

जड्डूने ज्या बॅटने CSK ला IPL ट्रॉफी जिंकून दिली, त्याचं काय केलं, माहितीये का? तुम्हीही कराल कौतुक

Pranali Kodre

Ravindra Jadeja gifts bat used to hit winning four in IPL 2023 final to Ajay Mandal: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जिंकले. 30 मेच्या मध्यरात्री संपलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर विजेतेपद कोरले आहे. 

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.

यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा मोहित शर्माच्या गोलंदाजीवर अखेरच्या दोन चेंडूत षटकार आणि मग विजयी चौकार मारला. यासह चेन्नईने हा सामना जिंकत आयपीएल 2023 विजेतेपदावर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्यानतंर जडेजाने त्याच्या एका कृतीतून अनेकांचे मन जिंकले आहे. जडेजाने अंतिम सामन्यात वापरलेली बॅट चेन्नई सुपर किंग्स संघाचाच भाग असलेल्या अष्टपैलू अजय मंडलला दिली आहे. याबद्दल अजयनेच इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली.

त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने जडेजाच्या बॅटचा फोटो शेअर करत लिहिले आहे की 'आशा आहे की अंतिम सामन्यात सर जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा केलेल्या लक्षात असतील. यानंतर त्याने आशिर्वादाच्या रुपात तीच बॅट मला दिली. हा सर जडेजा आहे. मी चेन्नई संघाचे खूप आभार मानतो की त्यांनी मला जड्डू भाईबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी दिली.'

चेन्नईने पाचव्यांदा जिंकले विजेतेपद

अंतिम सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्यांनी यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. यासह चेन्नईने मुंबईच्या पाच आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT