याला म्हणातात खिलाडूवृत्ती! चॅम्पियन CSK वर अन्य नऊ IPL संघांकडून कौतुकाचा वर्षाव; पाहा ट्वीट्स

चेन्नई सुपर किंग्सने IPL2023 विजेतेपद जिंकल्यानंतर आयपीएमधील इतर सहभागी संघांनीही खिलाडूवृत्ती दाखवत अभिनंदन केले आहे.
CSK
CSK Dainik Gomantak

All IPL Teams Congratulate CSK for winning 5th Trophy: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि विजेतेपद नावावर केले. चेन्नईच्या या विजेतेपदानंतर आयपीएमधील इतर सहभागी संघांनीही खिलाडूवृत्ती दाखवत अभिनंदन केले आहे.

रविवारी होणारा हा अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी हलवण्यात आला होता. पण सोमवारी सामना सुरू असतानाही पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर मध्यरात्री जवळपास 2 वाजताच्या सुमारात निकाल समोर आला.

त्यामुळे बराच काळ प्रतिक्षा करावी लागल्यानंतर अखेर चेन्नईने विजेतेपदाला गवसणी घातली. हे चेन्नईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले आहे.

CSK
IPL 2023 Final : पावसामुळे मॅच थांबली; तरीही चेन्नई जिंकू शकते ट्रॉफी; कसे? हर्षा भोगले यांनी सांगितलं समीकरण

हे विजेतेपद जिंकल्यानंतर उपविजेता झालेल्या गुजरात टायटन्सने ट्वीट केले आहे की 'प्रिय थाला, आम्हाला माहित होते की आमची फक्त तुझ्या हुशारीच्या विरुद्धच नाही, तर या परिकथेसारख्या अंतिम सामन्यात तुझ्या चाहत्यांविरुद्धही लढाई आहे. जरी आम्ही आज रात्री निराश असलो, तरी तू ती ट्रॉफी उचांवल्याचे पाहाताना आमच्यातील लहान मूल नेहमीप्रमाणेच आनंदी आहे.'

तसेच मुंबई इंडियन्सने ट्वीट केले की 'चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२३ जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही यासाठी पात्र होता.'

कोलकाता नाईट रायडर्सने ट्वीट केले आहे की 'शानदार मॅच. ५ व्या आयपीएल ट्रॉफीसाठी विसल पोडू. अभिनंदन चेन्नई सुपर किंग्स.'

सनरायझर्स हैदराबादने ट्वीटमध्ये म्हटले की 'आयपीएल २०२३ चा यल्लोवली शेवट. चेन्नई सुपर किंग्स अभिनंदन. गुजरात टायटन्सचे दुर्दैव होते, पण त्यांच्यासाठी हा संपूर्ण हंगाम शानदार राहिला.'

राजस्थान रॉयल्सने ट्वीट केलंय की अभिनंदन चेन्नई सुपर किंग्स. आयपीएल फायनलच्या दुसऱ्या बाजूला असणे सोपे नसते. पण २ हंगामात दोनदा फायनल गाठणे सोपे नाही. तुम्ही शानदार खेळलात गुजरात टायटन्स.'

लखनऊ सुपर जायंट्सने ट्वीट केले, '२०२३ यल्लोव वर्ष ठरले. चेन्नई सुपर किंग्स अभिनंदन, एमएस धोनी अभिनंदन.'

दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट केले 'लक्षात राहाण्यासारखा आयपीएल २०२३ अंतिम सामना. पाचव्या आयपीएल ट्रॉफीसाठी चेन्नई सुपर किंग्स अभिनंदन.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ट्वीट केले की 'परिकथेप्रमाणे शेवट. चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनी आयपीएल २०२३ जिंकल्याबद्दल अभिनंदन.'

पंजाब किंग्सने ट्वीट केले की 'थाला आणि आयपीएल स्वर्गात तयार झालेली जोडी. एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचे अभिनंतन.'

CSK
IPL 2023 Awards and Prize Money: चेन्नई-गुजरातच नाही, तर 'हे' खेळाडूही मालामाल! पाहा पुरस्कारांची संपूर्ण लिस्ट

चेन्नईचे पाचवे विजेतेपद

अंतिम सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केला. अखेरच्या दोन चेंडूत १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली.

तसेच  ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर विजेतेपद कोरले आहे. त्यामुळे चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षीही आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com