Debasis Mohanty Dainik Gomantak
क्रीडा

Debasis Mohanty B'day: भारताचा 'स्विंग किंग', ज्याला पाकिस्तानी दिग्गज घाबरत होते

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा सईद अन्वर याला भारताविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखण्यात येते. एकवेळ अशी आली होती की त्याने भारतीय गोलंदाजांना अशा प्रकारे मात दिली की सर्वांना असे वाटायला लागले की तो द्विशतक करूनच थांबेल. पण असे झाले नाही, तो 194 धावा करून बाद झाला तोपर्यंत त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या केली होती. (Cricket Debasis Mohanty Indian swing king who was at his best against Pakistan)

पण तुम्हाला माहित आहे का की हाच सईद अन्वर भारतीय गोलंदाजाला इतका घाबरायचा की त्याला पुढे काय करावे हेच कळत नव्हते. या गोंधळात एकदा तो सचिन तेंडुलकरची मदत घेण्यासाठी पोहोचला होता. आम्ही सांगत आहोत देबाशीष मोहंतीबद्दल, जो आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. देबाशिष सध्या बीसीसीआयच्या निवड समितीचा एक सदस्य आहे.

जगात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, जे प्रतिभावान असूनही ते स्थान मिळवू शकलेले नाहीत. 20 जुलै 1976 रोजी जन्मलेल्या देबाशिष मोहंती यांचाही यामध्ये समावेश आहे तर ओडिशाचा देबाशिष त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. हा किस्सा 1990 च्या दशकातील आहे. त्या काळात जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद यांची जोडी हिट ठरली होती पण 1997 च्या टोरंटो दौऱ्यापूर्वी दोघेही जखमी झाले होते.

अशा प्रकारे देबाशिष मोहंतीने टीम इंडियामध्ये प्रवेश केला. तो 1997 मध्ये टोरंटो येथे पहिला वनडे सामना खेळला. या मालिकेत त्याने पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वरला तीनदा बाद केले होते. टोरंटो चषकात भारताचा कर्णधार असलेल्या सचिन तेंडुलकरने यासंबंधीचा एक रंजक किस्सा सांगितला आहे.

सचिन तेंडुलकर एका मुलाखतीमध्ये सांगतो, 'देबाशिषने पहिल्या 4 सामन्यांमध्ये अन्वरला खूप त्रास दिला होता. मालिकेच्या चार सामन्यांनंतर एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू आले होते. त्यानंतर सईद अन्वर माझ्याकडे आला आणि अन्वरने मला विचारले - बाकी सर्व ठीक आहे, पण एक गोष्ट सांग देबाशिष काय करतोय? मी विचारले काय झाले आणि म्हणालो की त्याचा स्विंग मला अजिबात समजला नाही.

सचिनच्या म्हणण्यानुसार, सईद अन्वर म्हणाला की, 'जेव्हा मी चेंडू सोडतो तेव्हा तो चेंडू आतमध्ये येतो आणि जेव्हा मी चेंडू खेळतो तेव्हा तो बाहेर जातो. यावरून देबाशिषची स्विंग गोलंदाजी किती धोकादायक होती, याचा अंदाज आपल्याया येतोच. 'व्हॉट द डक' या कार्यक्रमात सचिनने हा किस्सा सांगितला होता.

योगायोगाने देबाशिष मोहंती यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि चार वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 45 वनडे सामने आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. देबाशिषने 45 वनडे सामन्यांमध्ये 57 विकेट घेतल्या. त्याने इंग्लंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर विश्वचषकात केनियाविरुद्ध त्याने ही कामगिरी (4/56) केली होती. तसेच देबाशिषने प्रथम श्रेणी सामन्यात एका डावात 10 विकेट्सही घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT