इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमधील तीन वनडे मॅचच्या सीरिजची पहिली मॅच चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळवली जात आहे. हा सामना इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्ससाठी (Ben Stokes) खास आहे, कारण स्टोक्सची ही शेवटची वनडे मॅच आहे. सोमवारीच स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. (eng vs sa 1st odi ben stokes emotional during last odi match watch video news)
इंग्लंडची टीम जेव्हा मैदानात फिल्डिंगसाठी उतरली तेव्हा मैदानावरील वातावरण भावुक झाले होते. मैदानात उतरताच बेन स्टोक्सच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. इंग्लंड क्रिकेटने याचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.
बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो टेस्ट आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे. स्टोक्सला काहीच दिवसांपूर्वी टेस्ट टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. टेस्ट टीमचा कर्णधार झाल्यानंतर स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला, तर भारताविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला. इंग्लंडने टेस्ट इतिहासात सगळ्यात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
* स्टोक्सचं वनडे करियर
स्टोक्सने 20व्या वर्षी 2011 साली आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून इंग्लंडकडून पदार्पण केले. 31 वर्षांच्या स्टोक्सने वनडे करियरमध्ये फक्त 104 सामन्यांमध्ये भाग घेतला. वनडेमध्ये (Oneday) त्याने 40 च्या सरासरीने 2919 रन केले. यात त्याच्या नावावर 3 शतकं आणि 21 अर्धशतकं आहेत. तसंच त्याने 74 विकेट देखिल घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.