Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

पुजाराने केली गावस्करांशी बरोबरी, 36 वर्षांनंतर एजबॅस्टन स्टेडियमवर रोखले इंग्लंडला

पुजारा 50 तर उपकर्णधार ऋषभ पंतने 30 धावा केल्या.

दैनिक गोमन्तक

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण केल्याने भारतीय संघाने (Team India) इंग्लंडविरुद्धच्या 5व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 3 बाद 125 धावा केल्या. यासह भारतीय संघाकडे एकूण 257 धावांची आघाडी आहे. पुजारा 50 तर उपकर्णधार ऋषभ पंतने 30 धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांमध्येच आटोपला. (Cheteshwar Pujara completed a brilliant half century at Edgbaston Stadium)

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जेवनानंतरच्या सेशनमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत जॉनी बेअरस्टोच्या शतकाचा प्रभाव कमी केला. त्यामुळे रविवारी तिसऱ्या दिवशी इंग्लंडला 284 धावांत गुंडाळून भारतीय संघाने पहिल्या डावात 132 धावांची मोठी आघाडी घेतली.

चेतेश्वर पुजारा खराब फॉर्मशी झुंजत होता आणि यामुळे तो टीम इंडियाच्या बाहेरही झाला होता. पण 5 व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले.

टीम इंडियाचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात 3 बाद 125 धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी 257 धावांवर गेली. ऋषभ पंत 30 धावा केल्यानंतर पुजाराच्या साथीने उभा होता. पंतने पहिल्या डावात 146 धावांची मोठी खेळी केली होती. तर या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे.

एजबॅस्टन स्टेडियमवर (Edgbaston Stadium) फलंदाजी करणे कुणासाठीही सोपे नाहीये. भारतीय सलामीवीर म्हणून पुजाराने 36 वर्षांनंतर मैदानावर अर्धशतक झळकावले आहे तर यापूर्वी जुलै 1986 मध्ये सुनील गावस्कर () यांनी हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी 54 धावा केल्या होत्या. या मैदानावर आतापर्यंत कोणत्याही भारतीय सलामीवीराला शतक झळकावता आलेले नाहीये.

34 वर्षीय चेतेश्वर पुजाराचे कसोटी कारकिर्दीतील एजबॅस्टनवरील हे 33वे अर्धशतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने 95 सामन्यात 44 च्या सरासरीने 6713 धावा केल्या आहेत. तर पुजाराने 18 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत. नाबाद 206 धावांची सर्वात मोठी खेळी देखील खेळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT