IND vs ENG: हिटमॅन संघात परतणार, T20 मालिकेसाठी आत्ताच करा तिकीट बूक

IND vs ENG हा सामना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे. मात्र या सामन्याचं तिकिट कस बूक करायचं...?
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

INDIA vs ENGLAND: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 जुलै रोजी होणार आहे. हा सामना साउथहॅम्प्टनच्या द रोज बाउल येथे रात्री 10.30 वाजता सुरू होईल. (IND vs ENG T20)

हा सामना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे. मात्र या सामन्याचं तिकिट कस बूक करायचं हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर नाराज होवू नका. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या T20 साठी तिकीट खरेदी करण्यात चाहत्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला या सामन्याची तिकीट बूक करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

Rohit Sharma
INDvsENG: ECB ने पाचव्या कसोटीच्या वेळेत केला बदल, आता यावेळी सुरू होणार सामना

अशा प्रकारे या सामन्याचं करा तिकीट बूक

  • तिकिटे बुक करण्यासाठी, अधिकृत तिकीट वेबसाइटवर लॉग इन करा

  • त्यानंतर Ageas Bowl सामन्याची तिकिटे शोधा आणि त्या बटणावर क्लिक करा.

  • तुम्हाला ज्या मॅचसाठी तिकीट बुक करायचे आहे त्या मॅचवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला सर्व तिकिटांच्या किमतींची यादी दिसेल.

  • आता तुमच्या बजेटनुसार सीट निवडा.

  • सीट निवडल्यानंतर, सर्व तपशील पुन्हा तपासा आणि पेमेंट करा.

  • पेमेंट केल्यानंतर कृपया पुष्टीकरणासाठी वेबपेज तपासा आणि लॉगिन संबंधित माहितीसाठी तुमचा ईमेल तपासा.

Rohit Sharma
माझ्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड सर्वोत्तम व्यक्ती :रवी शास्त्री

रोहित शर्माचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 T20 सामन्यांची मालिका 7 जुलैपासून खेळवली जाणार आहे. याआधी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हिटमॅन आज क्वारंटाइनमधून बाहेर येईल. बीसीसीआयने याआधीच रोहितची वनडे आणि टी-20 मालिकेसाठी रोहितची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. याआधी रोहित कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पाचव्या कसोटीतून बाहेर पडला होता.

पहिल्या T20 साठी भारतीय संघ तयार

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल. , आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com