Rohit Sharma Viral Post  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: ''अनफिट समझा क्या? सुपरफिट है मैं!''भारताच्या विश्वविजयानंतर भाजपचे 'पुष्पा' स्टाईल Tweet Viral

Rohit Sharma Viral: भाजपने रोहित शर्माला पुष्पाच्या वेशात पोस्ट करत सोशल मीडियावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलंय

Akshata Chhatre

BJP Post on Rohit Sharma: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात किविंचा पराभव करून भारत विश्वविजेता बनलाय. सहा बॉल बाकी ठेवत चार विकेट्ससह भारताने विजय नोंदवला. यानंतर सोशल मीडियावर मिमीसचा पाऊस पडत आहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे यात भारतीय जनता पक्ष देखील सामील झालाय. भाजपने रोहित शर्माला पुष्पाच्या वेशात पोस्ट करत सोशल मीडियावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलंय. पण असं का? चला जाणून घेऊया..

रोहित का झाला पुष्पा?

भारतीय जनता पक्षाने भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्मावर केलेल्या एका टिप्पणीवरून काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताच्या विजयानंतर, मोहम्मद यांनी शर्मा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि यानंतर भाजप आक्रमक झाला.

भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर 'पुष्पा' चित्रपटातील एक जीआयएफ शेअर केलीये, ज्यात पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनच्या जागी रोहितचा फोटो लावलाय. आणि कॅप्शन दिले, "अनफिट समजा क्या? सुपरफिट है मैं!"

भाजपच्या जीआयएफचा अर्थ काय?

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्मा याला अनफिट आणि जाड असं म्हटलं होतं. आणि त्याला वजन कमी करण्याची आवश्यकता असल्याचं सुचवलं होतं. मोहम्मद यांच्या त्या टिप्पणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त झाला होता आणि त्यांनी पोस्ट डिलीट करून माफी मागितली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर शर्माच्या नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केल्यानंतर भाजपने शास्त्र उगारलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT