Goa Crime: मालपे-पेडणे येथे 1.64 लाखांचा गांजा जप्त! गोवा पोलिसांची कारवाई; चंदगडच्या दोघांना अटक

Goa Ganja Seizure: मालपे-पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ परिसरात पेडणे पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत १.६३७ किलो गांजासह दोन जणांना अटक केली.
Ganja case
Ganja caseDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मालपे-पेडणे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ परिसरात पेडणे पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत १.६३७ किलो गांजासह दोन जणांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १.६४ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेले दोघेही चंदगड, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील आहेत.

पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हलर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी सायंकाळी ७.५५ ते रात्री ११.०५ या वेळेत मालपे येथील नीलिमा रेस्टॉरंटजवळील एनएच-६६ रस्त्यावर अमली पदार्थांविरोधात छापा टाकण्यात आला.

Ganja case
Sanquelim Ganja Seizure: पोलिसांना टीप मिळाली, निळी पिशवी उघडल्यावर विस्फारले डोळे; साखळीत मोठी कारवाई, गांजाचा साठा जप्त

या कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यातून हिरवट रंगाची वाळलेली पाने, बिया व देठ असलेला गांजा आढळून आला. हा गांजा एमएच-०९-जीयु-९१३४ क्रमांकाच्या मारुती एर्टिगा कारमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी विनोद कुंभार (वय ३०, रा. राजगोळी खुर्द, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि अतिक मलिक (वय २३, रा. तळगुली, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे.

Ganja case
Taleigao Ganja Seized: ताळगावात गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिशाच्या व्यक्तीला अटक

विनोद कुंभार हा व्यवसायाने चालक असून अतिक मलिक हा फॅब्रिकेटर असल्याचे समोर आले आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर व इतरांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com