Rohit Sharma: 'हिटमॅन' ईज बॅक! रोहितनं युनिव्हर्स बॉसचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडला

IND VS ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Rohit Sharma Record
Rohit Sharma RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Most Sixes In ODI

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या शैलीत परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं चांगली सुरुवात केली. यावेळी षटकारांचा एक विक्रम आपल्या नावावर केला. ख्रिस गेलला मागे टाकत एका मोठ्या विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले आहे.

कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतानं ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त शतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडनं दिलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जवळपास ५ षटके राखून आणि ४ विकेट्सने सामना जिंकला.

Rohit Sharma Record
Rohit Sharma: मैदानात उतरताच 'हिटमॅन'ने रचला इतिहास, केला 'हा' मोठा पराक्रम

रोहित शर्माची बॅट बराच काळ शांत होती. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात त्यानं तुफानी शतक झळकावलं. यासाठी त्यानं ७६ चेंडूंचा सामना केला. आपल्या शतकी खेळीमध्ये ७ षटकार आणि १२ चौकार मारले.

रोहित शर्माच्या वन-डे कारकिर्दीतील हे ३२ वे शतक आहे. त्यानं १३२ च्या स्ट्राईक रेटनं ९० चेंडूत ११९ धावांची खेळी केली. रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसांनी शतक ठोकलं.

Rohit Sharma Record
Rohit Saraf: मिसमॅच्ड फेम रोहित आहे तरी कोण?

सर्वाधिक षटकार

रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं एक षटकार मारताच दुसऱ्या स्थानावर झेप मारली आहे. रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये एकूण ३३८ षटकार झाले आहेत.

सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) : ३६९ डावात ३५१ षटकार

  • रोहित शर्मा (भारत): २५९ डावात ३३८ षटकार

  • ख्रिस गेल (वेस्ट इंडीज): २९४ डावात ३३१ षटकार

  • सनथ जयसूर्या (श्रीलंका) : ४३३ डावात २७० षटकार

  • एमएस धोनी (भारत): २०७ डावात २२९ षटकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com