ISL 2026: FC Goa भिडणार पंजाबशी! दिल्ली येथे रंगणार लढत; मार्केझ यांच्या संघासमोर अपराजित राहण्याचे आव्हान

FC Goa Vs Punjab FC: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील दोन मोसमात एफसी गोवाने पंजाब एफसीविरुद्ध सामना गमावलेला नाही.
FC Goa Vs Punjab FC
FC Goa Vs Punjab FCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील दोन मोसमात एफसी गोवाने पंजाब एफसीविरुद्ध सामना गमावलेला नाही, त्याचवेळी यंदाच्या स्पर्धेत मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ अपराजित आहे, तरीही सोमवारी (ता. १६) गोव्यातील संघाला कठीण प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करताना दक्ष राहावे लागेल.

सामना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी मार्केझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘‘आम्ही कधीही पंजाब एफसीविरुद्ध पराभूत झालेला नाही ही बाब खरी असली,

तरी प्रत्येकवेळी सामना निसटत्या फरकाने जिंकलेलो आहे हे नाकारत नाही. गतवर्षी सुपर कपमध्ये भरपाई वेळेतील गोलमुळे विजय मिळाला. त्यांच्यापाशी चांगला प्रशिक्षक आहे. संघात जम बसलेले भारतीय खेळाडू असून त्यापैकी काहीजण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. माझ्यामते सामना कठीण असेल.’’

एफसी गोवा संघाने चार लढतीत दोन विजय व दोन बरोबरींसह आठ गुणांची कमाई केली आहे. मागील लढतीत कोलकाता येथे त्यांनी मातब्बर ईस्ट बंगालला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. या कामगिरीविषयी मार्केझ म्हणाले,

की ‘‘यावेळच्या मोसमात आम्ही खूपच छान कामगिरी करत आहोत. ईस्ट बंगालविरुद्ध आम्ही अधिकांश वर्चस्व राखणारा खेळ केला. सध्या आमच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण खूपच चांगले आहे. एके दिवशी पराभव पत्करावाच लागेल, पण ड्रेसिंग रुममधील भावना पराकोटीची आहे.

FC Goa Vs Punjab FC
ISL 2026: अपराजित 'FC Goa', नोंदवला सलग दुसरा विजय; स्पोर्टिंग क्लब दिल्लीचा 1-0 ने पराभव

सरावात खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. आपण सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू झटत आहे.’’ पानागिओटिस डिल्मपेरिस यांच्या मार्गदर्शनाखालील पंजाब एफसीने तीन लढतीत प्रत्येकी एक विजय, बरोबरी व पराभव या कामगिरीसह चार गुण प्राप्त केले आहेत. बंगळूर एफसीला दोन गोलने पराभूत करणाऱ्या या संघाने घरच्या मैदानावर मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडला १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते.

FC Goa Vs Punjab FC
ISL Football: FC Goaच्या खात्यात पूर्ण तीन गुण! मोरेनो, द्राझिचचे गोल; मोहम्मेडन स्पोर्टिंगला नमविले

नॉर्थईस्ट, मुंबई सिटीचे विजय

आयएसएल स्पर्धेत रविवारी गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडने जमशेदपूर एफसीवर २-१ फरकाने मात केली. नॉर्थईस्टचे दोन्ही गोल अँडी रॉड्रिगेझ (५३ व ६९ वे मिनिट) याने केले, तर जमशेदपूर एफसीचा गोल राफेल मेस्सी बौली याने ६८व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला. कोलकाता येथे मुंबई सिटीने इंटर काशी संघाला २-१ असे नमविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com