Sameer Amunekar
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी सुरूच आहे.
टी-२० वर्ल्डकपनंतर आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या एका महिला नेत्यानं रोहित शर्माच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माविरोधात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी रोहितला लठ्ठ म्हटलं आहे. याशिवाय त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केला.
तसंच शमा मोहम्मद यांनी रोहितला सर्वात अप्रभावी कर्णधार म्हटलंय. त्यांच्या या विधानानंतर क्रिकेट चाहत्यांकडून शमा यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
मात्र, यावर प्रत्यूत्तर देताना शमा मोहम्मद यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली आणि कपिल देव यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत रोहितच्या कामगिरीवर बोललो असल्याचं म्हटलं.