India vs New Zealand: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी-20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड समितीने हार्दिक पांड्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. संघाचे नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी सलामीवीर केएल राहुल देखील या दौऱ्याचा भाग असणार नाही. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावणारा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
दरम्यान, सोमवारी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने (BCCI) सांगितले की, 'शिखर धवन या दौऱ्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल, तर ऋषभ पंत दोन्ही मालिकेत उपकर्णधार असेल. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलही संघात पुनरागमन करणार आहेत.'
दुसरीकडे, भारतीय संघ 18 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याने दौऱ्याची सुरुवात करेल. पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. टीम इंडिया (Team India) 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला टी-20 आणि त्यानंतर 25, 27 आणि 30 नोव्हेंबरला एकदिवसीय सामने खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टीरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हरदीप सिंग पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अरविंद यादव सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका सामना (भारतीय वेळेनुसार):
भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिका
पहिला T20, 18 नोव्हेंबर, दुपारी 12.00 वाजता, वेलिंग्टन
दुसरा T20, 20 नोव्हेंबर, दुपारी 12.00, माउंट मौनगानुई
तिसरा T20 सामना, 22 नोव्हेंबर दुपारी 12.00 वाजता, नेपियर
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय, 25 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, ऑकलंड
दुसरी वनडे, 27 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, हॅमिल्टन
तिसरी एकदिवसीय, 30 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, क्राइस्टचर्च
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.