T20 World Cup: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक 2021 सुरु होणार आहे. T20 विश्वचषकात भारताला 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत असा एक खेळाडू आहे, ज्याची निवड T20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2022) साठी 15 सदस्यीय भारतीय संघात होऊ शकते. सध्या या खेळाडूचा T20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे.
भारताच्या या राखीव खेळाडूला T20 विश्वचषकात प्रवेश मिळणार
दीपक चहरला (Deepak Chahar) टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या T20 विश्वचषकातून (T20 World Cup) बाहेर पडल्यानंतर दीपक चहरला भारताच्या 15 सदस्यीय संघात स्थान मिळू शकते. दीपक चहरकडे आपल्या चमकदार कामगिरीने कोणत्याही संघाला थक्क करण्याची प्रतिभा आहे.
हा खेळाडू खूप धोकादायक आहे
दीपक चहरकडे वेगाव्यतिरिक्त उत्कृष्ट स्विंग आहे. चहरला त्याच्या वेगवान फलंदाजीसाठीही ओळखले जाते. दीपक चहरला सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये अत्यंत घातक गोलंदाजी करुन विकेट घेण्याची कला अवगत आहे.
T20 विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात खेळायचे निश्चित!
दीपक चहर टी-20 विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात खेळणार आहे. दीपक चहरने टीम इंडियासाठी (Team India) 9 एकदिवसीय आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 15 आणि 26 विकेट घेतल्या आहेत. दीपक चहर पॉवरप्लेमध्ये त्याच्या धारदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चहर नवीन चेंडूवर विकेट घेण्यात माहीर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.