India Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

India Squad: टीम इंडियाची इंग्लंड-ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकांसाठी घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

India Women Cricket Squad: डिसेंबर महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या क्रिकेट मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

BCCI announced Team India Women squad for Matches against England and Australia:

भारतात सध्या क्रिकेटचा हंगात जोरात सुरू आहे. आता बीसीसीआयने भारतीय महिला संघाच्या पुढील मालिकांसाठीही संघ जाहीर केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी महिला निवड समितीने संघांची घोषणा केली आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध भारताला 3 टी20 सामने आणि 1 कसोटी सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यांसाठी संघनिवड झाली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिकाही होणार आहे, पण त्याबद्दल काही दिवसांनी घोषणा केली जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

दरम्यान, सध्या निवडलेल्या टी२० आणि कसोटी संघांचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी स्मृती मानधनाकडे असणार आहे. याशिया दोन्ही संघात फारसा बदल नाही.

टी20 संघात अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, कनिका अहुजा आणि मिन्नू मणी या खेळाडूंना संधी मिळाली आहे, पण त्यांना कसोटी संघात संधी मिळाली नाही. बाकी सर्व खेळाडू दोन्ही संघांचा भाग आहेत.

इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकार

वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका

  • 6 डिसेंबर - पहिला टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 9 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 10 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना

  • 14 ते 17 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - स. 9.30 वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना

  • 21 ते 24 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - स. 9.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT