Bangladesh Cricket Dainik Gomantak
क्रीडा

दिग्गज ऑलराऊंडरकडे बांगलादेशची कॅप्टन्सी! Asia Cup साठी 17 खेळाडूंचा संघही जाहीर

Bangladesh Squad: आशिया चषकासाठी बांगलादेशने 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून नवीन कर्णधाराचीही घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Bangladesh Cricket announce squad for Asia Cup 2023:

पाकिस्तान आणि श्रीलंकेत 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता काही दिवसांचाच कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठी सहभागी संघांनी आपापले संघ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 9 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने संघ जाहीर केला होता, आता 12 ऑगस्ट रोजी बांगलादेशनेही आपला 17 जणांचा संघ जाहीर केला आहे.

दरम्यान, संघ जाहीर करण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनकडे आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

तमिम इक्बालने ऑगस्टच्या सुरुवातीलाच अचानक वनडे कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषकातूनही नाव मागे घेतले होते. त्यामुळे बांगलादेशला नव्या कर्णधाराची नियुक्ती करणे भाग होते. अशा परिस्थितीत पुढील महत्त्वाच्या स्पर्धांचा विचार करता बांगलादेशने अनुभवी अष्टपैलू शाकिबकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

आशिया चषकासाठी संघ

दरम्यान, आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या बांगलादेशच्या संघात तांझिद हसन तमिम आणि शमिम हुसेन पटवरी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा 2020 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकलेल्या बांगलादेश संघात सहभाग होता.

दरम्यान, सौम्य सरकारला पुन्हा संघात संधी मिळेल अशी अनेकांचा अंदाज होता. पण त्याची संघात निवड झालेली नाही. त्याचबरोबर महमुद्दलाह रियाधचाही विचार करण्यात आलेला नाही.

असा आहे आशिया चषकासाठी बांगलादेश संघ

शाकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तांझिद हसन तमिम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन ममहुद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसैन, शोरीफुल इस्लाम, इबादत हुसेन, मोहम्मद नईम.

आशिया चषक 2023

वनडे स्वरुपात होणारा आशिया चषकात सुपर सिक्स फेरीसाठी ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना कोलंबोला खेळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT