Asia Cup 2023: भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान सज्ज! 17 खेळाडूंची टीम जाहीर, 'या' ऑलराऊंडरचे पुनरागमन

Pakistan Squad: आशिया चषकासाठी बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाची घोषणा झाली आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Squad for Asia Cup 2023: श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आता केवळ 3 आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे सहभागी संघ त्यादृष्टीने तयारी करत आहेत. दरम्यान पाकिस्तानने या स्पर्धेसाठी 17 जणांचा संघ जाहीर केला आहे.

नुकतीच पाकिस्तान संघाच्या निवड समीतीच्या अध्यक्षपदी इंजमाम-उल-हक यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेला हा पहिलाच संघ आहे.

पाकिस्तान निवड समीतीने आशिया चषकासाठी अष्टपैलू फहिम अश्रफला संघात संधी दिली आहे. अश्रफ दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून अखेरचा वनडे सामना खेळला आहे. तसेच युवा तय्यब ताहिरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामिगिरी केल्याचे बक्षीस मिळाले असून त्यालाही संघात संधी मिळाली आहे. या संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

Pakistan Cricket Team
Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वीच दिग्गजाचा मोठा निर्णय, कॅप्टन्सी सोडण्याबरोबरच स्पर्धेतूनही माघार

तसेच शान मसूदला सातत्याने मोठ्या धावा करण्यात आलेल्या अपयशानंतर संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय एहसानुल्ला सध्या कोपराच्या दुखापतीतून सावरत असल्याने त्याला संघात निवडण्यात आलेले नाही.

दरम्यान, आशिया चषकापूर्वी 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान पाकिस्तान संघ अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

  • आशिया चषकासाठी पाकिस्तान संघ - अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरीस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

Pakistan Cricket Team
Asia Cup 2023 Schedule: सहा संघात रंगणार थरार! कधी आणि कुठे होणार भारताचे सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

असा रंगणार आशिया चषक

आशिया चषकात भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची सुपर सिक्स फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना कोलंबोला खेळणार आहेत.

या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे खेळवला जाणार आहे.

याबरोबरच ज्याप्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार जर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांनी प्रवेश केला, तर या दोन संघात 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा सामना होईल.

ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com