Asia Cup 2023: भारतीय संघाच्या जर्सीवर का असू शकते पाकिस्तानचं नाव? खरं कारण जाणून घ्या

Asia Cup 2023: आशिया चषकावेळी भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नावही का असू शकते, यामागील खरे कारण जाणून घ्या.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Why Pakistan Name may On Team India Jersey in Asia Cup 2023:

आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या देशात खेळवली जाणार आहे. तीन आठवड्यांचा कालावधी असलेल्या या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.

याचदरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात भारतीय खेळाडूंनी घातलेल्या जर्सीवर पाकिस्तानचेही नाव दिसत आहे. यामुळे अनेक आफवाही पसरायला लागल्या. पण आता यामागील खरे कारण जाणून घेऊ.

भारतीय संघ त्यांच्या जर्सीवर पुढे पाकिस्तानचे नाव लिहिणार नाही. पण जर्सीच्या उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आशिया चषक स्पर्धेचा लोगो आणि त्याखाली पाकिस्तान हे नाव असू शकते. यामागेही महत्त्वाचे कारण आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) स्पर्धांमध्ये खेळाडूंना जर्सीवर पुढच्या बाजूला स्पॉन्सर्सचे नाव लिहिता येत नाही. जर्सीवर आपापल्या देशाचे नाव पुढे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते.

याबरोबरच जर्सीच्या समोरच्या बाजूच्या खांद्याच्या खाली उजव्या बाजूला स्पर्धेचा लोगो आणि आयोजक किंवा सह-आयोजकांचे नाव लिहिलेले असते.

Team India
World Cup 2023: शिक्कामोर्तब झालं! भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ICC ची घोषणा

आशिया चषक 2023 स्पर्धेचे अधिकृत आयोजक पाकस्तान आहे. मात्र पाकिस्तानमध्ये खेळण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या देशात खेळवली जाणार आहे. याचमुळे आशिया चषकात सहभागी होणाऱ्या सर्वच संघांच्या जर्सीवर आशिया चषकाच्या लोगोखाली पाकिस्तानचे नाव असू शकते.

वर्ल्डकप 2023 मध्ये जर्सीवर असणार भारताचे नाव

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे आयोजक भारत आहे. ही संपूर्ण स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याचमुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाकिस्तानसह सर्वच संघांच्या जर्सीवर उजव्या बाजूला वरती वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या लोगोसह भारताचे नाव असू शकते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2016 साली टी वर्ल्डकप जेव्हा भारतात खेळवला होता, तेव्हाही स्पर्धेच्या लोगोखाली भारताचे नाव लिहिण्यात आले होते.

Team India
Asia Cup 2023: भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान सज्ज! 17 खेळाडूंची टीम जाहीर, 'या' ऑलराऊंडरचे पुनरागमन

असा रंगणार आशिया चषक

आशिया चषकात भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची सुपर सिक्स फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना कोलंबोला खेळणार आहेत.

ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Team India Bilateral Series Before World Cup 2027
BCCI Refuses Trophy From Mohsin Naqvi
Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
India vs Pakistan women’s Asia cup 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com