Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: बाबर आझमने सोडली कॅप्टन्सी! मायदेशी परतताच सोशल मीडियावर जाहीर केला मोठा निर्णय

Babar Azam resign Captaincy: बाबर आझम वर्ल्डकप २०२३ मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे.

Pranali Kodre

Babar Azam resign as Pakistan Captain from all format of Cricket after ICC Cricket World Cup 2023:

भारतात चालू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचे पाकिस्तानचे स्वप्न थोडक्यात भंगले. पाकिस्तानला साखळी फेरीत 9 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला होता, तर 5 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर पाकिस्तान संघावर आणि बाबर आझमच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी बाबरने नेतृत्वाचा राजीनामा देण्याबद्दल सुचवले होते. अखेर पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर बाबर आझमने बुधवारी (15 नोव्हेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.

बाबरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 2019 मध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करण्यासाठी कॉल आला होता. शेवटच्या 4 वर्षात मी मैदानात आणि बाहेर अनेक चढ-उतार पाहिले, पण मी नेहमीच मनापासून क्रिकेट जगतात पाकिस्तानचा मान-सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे.'

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर पोहतण्यामध्ये खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, संघव्यवस्थापनाचे मिळून योगदान राहिले आहे. या संपूर्ण प्रवासात पाकिस्तानच्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.

आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता, पण मला असे वाटते की हीच हा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ होती.

तसेच बाबर आझमने असेही सांगितले की तिन्ही क्रिकेट प्रकारात तो खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहिल. त्याने लिहिले, 'मी नव्या कर्णधाराला आणि संघाला माझ्या अनुभवाचा आणि योगदानाचा फायदा करून देण्यासाठी नेहमीच तयार असेल.'

त्याचबरोबर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही आभार मानले.

बाबरने 20 कसोटी सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले होते, ज्यातील 10 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला, तर 6 सामन्यात पराभव स्विकारला होता. तसेच 4 सामने अनिर्णित राहिले होते.

त्याचबरोबर 43 वनडे सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली 26 सामन्यात विजय मिळवले, तर 15 सामन्यांत पराभव स्विकारला. त्याचबरोबर 1 सामना बरोबरीत, तर एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.

त्याने 71 टी20 सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले होते, ज्यात त्याने 42 सामन्यात विजय मिळवला, तर 23 सामन्यात पराभव पत्करला, तसेच 6 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT