Babar Azam: 'टीव्हीवर बोलणे सोपे, सल्ला द्यायचाय तर...', विराटच्या नावासह विचारलेल्या प्रश्नावर भडकला बाबर आझम

Pakistan Team Captaincy: बाबर आझमने त्याच्या नेतृत्वावर होत असलेल्या टीकेला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सडेतोड उत्तर दिले आहे.
Babar Azam
Babar AzamICC
Published on
Updated on

Babar Azam opened up on Criticism on his Captaincy ahead of Pakistan vs England Match in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाकिस्तानला अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध शनिवारी (11 नोव्हेंबर) खेळायचा आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करणार की नाही, याबाबत निकाल समोर येणार आहे.

मात्र, याचदरम्यान अशीही चर्चा आहे की या वर्ल्डकप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कर्णधारपद सोडू शकतो. गेल्या काही दिवसात अनेक माजी खेळाडूंनी बाबरला नेतृत्व सोडून फलंदाजीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

याचवेळी मीडियातील काही वृत्तांनुसार बाबरने स्पष्ट केले आहे की तो स्वत:हून कर्णधारपद सोडणार नाही, मात्र जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला याबाबत सांगितले, तर तो नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेईल.

Babar Azam
Babar Azam: भारताविरुद्धच्या पराभवानंतर बाबरचा कसा केला पाकिस्तान टीमने वाढदिवस साजरा, पाहा Video

बाबरने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 8 सामन्यात 282 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत 8 पैकी 4 सामने पाकिस्तानला जिंकता आले आहेत. आता उपांत्य फेरीत पोहण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध अत्यंत मोठा विजय मिळवावा लागणार आहे. अशात बाबर आझमला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझमला विचारण्यात आले होते की तो विराट कोहलीने ज्याप्रमाणे नेतृत्व सोडले, त्याचप्रमाणे तो फलंदाज म्हणून यापुढे खेळू शकतो का? यावर त्याने सांगितले की 'मी माझ्या संघाचे गेले 3 वर्षे नेतृत्व करत आहे आणि मला असे यापूर्वी कधीही वाटले नाही.'

'माझी अपेक्षेप्रमाणे वर्ल्डकपमध्ये कामगिरी न झाल्याने ही चर्चा होत आहे. त्यामुळे लोकांना वाटते माझ्यावर दबाव आहे. पण माझ्यावर दबाव नाही. मी गेल्या अडीच-तीन वर्षे ही जबाबदारी सांभाळत आहे. मी तेव्हा चांगली कामगिरी करत होतो आणि कर्णधारही होतो. मी आत्ताही त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय.'

Babar Azam
T20 World Cup 2007 फायनलमध्ये धोनीला जोगिंदरकडे गोलंदाजी देण्याचा सल्ला कोणी दिला? युवीचा गौप्यस्फोट

तो म्हणाला, 'प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन असतो, प्रत्येकाचा वेगळा विचार असतो. प्रत्येकजण काहीतरी वेगळे बोलत असतो. त्याने असे करावे, असे करू नये. जर कोणाला मला काही सल्ला द्यायचा असेल, तर प्रत्येकाकडे माझा फोननंबर आहे. टीव्हीवर सल्ला देणे कधीही सोपे आहे. जर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल, तर मला मेसेज करा.'

याशिवाय कर्णधारपदाबद्द तो म्हणाला, परत पाकिस्तानला गेल्यानंतर त्यावर काय तो निर्णय होईल, सध्यातरी वर्ल्डकपवर लक्ष्य केंद्रित केलेले आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायचे असेल, तर...

सध्या न्यूझीलंडचा नेट रनरेट हा पाकिस्तानपेक्षा खूप चांगला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केली, तर कमीत कमी 287 धावांनी विजय मिळवावा लागेल.

तसेच जर त्यांनी प्रथम गोलंदाजी केली, तर त्यांना इंग्लंडला 50 धावांत सर्वबाद करून 2 षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल किंवा 100 धावांत रोखत 3 षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल. जर असे झाले, तरच पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com