India Women Team Twitter
क्रीडा

Asian Games 2023: पाऊस भारताच्या पथ्यावर, सामना रद्द होऊनही महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये!

India Women's Cricket Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

Asian Games 2023 India vs Malaysia Women Cricket Match: चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

गुरुवारी भारतीय महिला संघाचा मलेशिया महिला संघाशी उपांत्यपूर्व फेरीत सामना झाला. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर भारतीय महिला संघाला पुढच्या फेरीत प्रवेश देण्यात आला.

भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 2 बाद 173 धावा केल्या होत्या, पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 15-15 षटकांचा करण्यात आला.

त्यानंतर मलेशियासमोर 177 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते, मात्र मलेशिया संघ फलंदाजीला आल्यानंतर दोन चेंडूंचा खेळ झाला आणि पावसामुळे पुन्हा सामना थांबला.

त्यानंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेर भारतीय संघाला त्यांच्या या स्पर्धेतील उच्च मानांकनामुळे उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला.

झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे झालेल्या या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला.

भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता.

पण अर्धशतकी भागीदारीनंतर सहाव्या षटकात कर्णधार स्मृती मानधनाला 27 धावांवर माहिरान इझ्झती इस्माईलने बाद केले.

त्यानंतरही शफालीने आपली लय काय ठेवली, तिला जेमिमाह रोड्रिग्सने शानदार साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी आक्रमक खेळताना 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. या दरम्यान शफालीने अर्धशतक झळकावले.

मात्र, ती मास एलिसाने गोलंदाजी केलेल्या 13 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पायचीत झाली. तिने 39 चेंडूत 67 धावांची खेळी करताना 4 चौकार आणि 5 षटकार मारले. ती बाद झाल्यानंतरही भारतीय संघाचा झंझावात संपला नव्हता.

अखेरीस जेमिमाह बरोबर फलंदाजी करताना रिचा घोषनेही तुफानी खेळी केली. त्यामुळे भारताने 15 षटकात 173 धावांचा डोंगर उभारला.

जेमिमाह 29 चेंडूत 47 धावांवर नाबाद राहिली, तर रिचा 7 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावा करून नाबाद राहिली.

त्यानंतर मलेशियाकडून ऐना हमिझाह हाशिम आणि कर्णधार विनफ्रेड दुराईसिंगम सलामीला फलंदाजीला उतरल्या होत्या.

ऐनाने एक धावही काढली. मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने मलेशियाचे आव्हान संपुष्टात आले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्यात भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौरऐवजी स्मृती मानधनाने केले, कारण हरमनप्रीतवर आयसीसीने बांगलादेश दौऱ्यात पंचांशी वाद घातल्याप्रकरणी 2 सामन्यांची बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT