Asian Games 2023: भारतीय फुटबॉल टीमची सुरुवात पराभवाने, चीनने मिळवला दणदणीत विजय

India Football Team: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला चीनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
India vs China Football
India vs China FootballTwitter
Published on
Updated on

India Football Team lost 5-1 to China in Asian Games 2023 :

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. भारताचा पहिला सामना मंगळवारी (19 सप्टेंबर) यजमान चीनविरुद्ध झाला. पण या सामन्यात भारताला 5-1 अशा गोल फरकाने दारूण पराभव स्विकारावा लागला.

चीनकडून या सामन्यात जिओ तिनयी (17 मिनिट), देई वेइजून (51 मिनिट) , ताओ कियांगलोंग (72 मिनिट व 75 मिनिट) आणि हाओ फेंग (90+2 मिनिट) यांनी गोल केले, तर भारताकडून राहुल केपीने (45+1) गोल नोंदवला.

India vs China Football
Asian Games: BCCI ची मोठी घोषणा! दोन्ही भारतीय संघात केले महत्त्वाचे बदल, पाहा संपूर्ण टीम

आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरलेला भारताचा संघ हा तिसऱ्या दर्जाचा असल्याचे म्हटले जात आहे. यावरून बरीच चर्चाही स्पर्धेपूर्वी झाली होती. दरम्यान, या स्पर्धेत चीनकडून जिओ तिनयी याने पहिला गोल करत आघाडी मिळवून दिली होती.

त्यानंतर भारताकडून 17 वर्षांखालील विश्वचषकात खेळलेल्या राहुल केपीने पहिल्या हाफनंतरच्या भरपाई वेळेत पहिल्या मिनिटाला गोल नोंदवला होता. तसेच त्यानंतर चीनच्या कर्णधार झ्यु छेंजीने गोलसाठी केलेला प्रयत्न भारताच्या गुरमीत सिंग चहलने आडवला. त्यामुळे 1-1 अशी बरोबरी पहिल्या हाफनंतर होती.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये चीनने आक्रमण केले. वेइजूनने 51 व्या मिनिटाला गोल करत पुन्हा चीनला आघाडी मिळवून दिली, तर ताओ कियांगलोंगने 72 मिनिट आणि 75 मिनिटाला दोन सलग गोल नोंदवत भारताला पिछाडीवर ढकलले. भारतीय संघाला नंतर पुनरागमन करणे कठीण झाले, त्यातच 90 मिनिटानंतर भरपाई वेळेत हाओ फेंगनेही गोल नोंदवला.

India vs China Football
IND vs SL Final: 'खूप प्रश्न विचारले जातील...', फायनलमधील दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य

आता भारताला बांगलादेश आणि म्यानमान संघांशी 21 आणि 24 सप्टेंबर रोजी सामना रंगणार आहे, या दोन संघांविरुद्ध विजय मिळवणे आता भारताचा गरजेचे असणार आहे. म्यानमारने बांगलादेशविरुद्धही 4-2 अशा फरकाने विजय मिळवला आहे.

भारतीय संघ आशियाई स्पर्धेसाठी क्रीडाग्राममध्ये सोमवारी संध्याकाळी पोहचला होता. त्यामुळे भारतीय खेळाडू दमलेले होते आणि त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. कर्णधार सुनील छेत्री 85 व्या मिनिटे मैदानात होता. पण त्याला कोणाकडून फारशी मदत मिळाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com