Babar Azam & Dasun Shanaka Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs SL: श्रीलंकेने भारताला दिली साथ, पाकिस्तान लालबूंद; वनडे मालिका केली रद्द!

Asia Cup Controversy: दीर्घकाळ जागतिक क्रिकेटमध्ये एकाकी पडलेला पाकिस्तान आता आशिया खंडातही एकाकी पडताना दिसत आहे.

Manish Jadhav

Asia Cup Controversy: दीर्घकाळ जागतिक क्रिकेटमध्ये एकाकी पडलेला पाकिस्तान आता आशिया खंडातही एकाकी पडताना दिसत आहे.

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपला राग इतर देशांवर काढत आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेसोबत एकदिवसीय मालिका खेळण्याची ऑफर नाकारली, कारण श्रीलंकेने आशिया चषकाच्या यजमानपदाचा प्रस्ताव ठेवला आहे.

दरम्यान, यंदाच्या प्रस्तावित आशिया चषकाबाबत गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानसोबत वाद सुरु आहे. बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही आणि आशिया कप तिसऱ्या देशात खेळवला जाईल.

यानंतर पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेलबद्दल सांगितले, ज्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये 4 सामने आणि उर्वरित तिसऱ्या देशात खेळण्याचा प्रस्ताव होता.

श्रीलंकेचा पाठिंबा, पाकिस्तान नाराज

पीसीबीच्या हायब्रीड मॉडेललाही बीसीसीआयकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. या सगळ्यात श्रीलंकेने संपूर्ण स्पर्धा आपल्याच देशात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पाकिस्तानी बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, श्रीलंकेच्या या पावलामुळे पीसीबीने नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत जुलैमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका श्रीलंकेत होणार आहे.

श्रीलंकेच्या बोर्डाने या मालिकेसह पाकिस्तानसमोर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचाही प्रस्ताव ठेवला होता. पाकिस्तानी बोर्डाने सुरुवातीला याबाबत सकारात्मक संकेत दिले होते, मात्र आशिया चषकाबाबत श्रीलंकेच्या भूमिकेनंतर त्यांनी ही मालिका पूर्णपणे रद्द केली.

पाकिस्तान एकटा पडणार का?

केवळ श्रीलंकाच नाही तर पीसीबी सध्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डावरही नाराज आहे, कारण त्यांनी आयपीएल फायनलदरम्यान बीसीसीआयसोबतच्या बैठकीत पाकिस्तानच्या (Pakistan) हायब्रिड मॉडेलवर पाठिंबा दिला नाही.

एकूणच, पाकिस्तान आपल्या सर्व शेजारी आणि आशियाई क्रिकेटमधील प्रमुख खेळाडूंशी संघर्ष करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकाकी पडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

Taliban Attack Video: लाँग रेंजवरुन अचूक निशाणा साधत केला खेळ खल्लास; 40 पाकिस्तानी जवान ठार; तालिबानी संघटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहा

katrina kaif Pregnant: "ही तर 2 वर्षांपासून गरोदर" विकी-कतरीनाची 'गुड न्यूज' चर्चेत, नोव्हेंबरमध्ये पाळणा हलणार?

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे झाले; 'जैश'च्या टॉप कमांडरने जाहीरपणे केलं मान्य Watch Video

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT