Pak Vs SL: फायनलपूर्वी पाकिस्तानला श्रीलंकेचा धडा; पाच गडी राखून मिळवला विजय

Pak Vs SL: फायनलपूर्वी पाकिस्तानला श्रीलंकेचा धडा; पाच गडी राखून मिळवला विजय

आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका (Srilanka) संघाने पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाला चांगलाच धडा शिकवला आहे. शुक्रवारी झालेल्या सुपर फोर फेरीतील सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाने सर्वबाद 121 धावा केल्या, श्रीलंकेने पाच गड्यांच्या बदल्यात 17 षटकांतच हे आव्हान पूर्ण केले. दोन्ही संघात रविवारी (दि.11) आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला जाईल.

Pak Vs SL: फायनलपूर्वी पाकिस्तानला श्रीलंकेचा धडा; पाच गडी राखून मिळवला विजय
"तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष होणार का...?" राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले

पाकिस्तान संघाने प्रथम फंलदाजी करत सर्वबाद 121 धावा केल्या, पाकिस्तान संघाने वीस षटके देखील पूर्ण खेळली नाहीत. त्यांचा सर्व संघ 19.1 षटकात बाद झाला. 122 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला श्रीलंका संधाने 17 षटकांत आव्हान पूर्ण करत पाकिस्तानला आस्मान दाखवले. श्रीलंकेकडून निसांकाने सर्वाधिक 55 धावा केल्या.

आशिया चषकाचा अंतिम सामना देखील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने, आशिया चषक कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पाकिस्तानला फायनलूर्वी हार मिळाल्याने संघाला चांगलाच झटका बसला आहे.

Pak Vs SL: फायनलपूर्वी पाकिस्तानला श्रीलंकेचा धडा; पाच गडी राखून मिळवला विजय
श्रीलंकेसह पाकिस्तानच्या देखील महाराणी होत्या एलिझाबेथ द्वितीय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com