India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: भारत - पाकिस्तान 'या' दिवशी लढणार? तारिख अन् ठिकाणाबद्दल आली मोठी अपडेट

India vs Pakistan: आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या संभाव्य तारिख आणि ठिकाणाबद्दल मोठी अपडेट आली आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, India vs Pakistan, probable date and place: आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. पण असे असले तरी अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही.

मात्र, आता असे समोर येत आहे की आशियाई क्रिकेट परिषदेकडून (ACC) अंतिम वेळापत्रक तयार करण्यात आले असून 19 जुलैला संध्याकाळी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

तसेच इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी 31 ऑगस्टला ही स्पर्धा सुरू होईल, असे एसीसीने सांगितले होते. पण आता ही स्पर्धा एक दिवस आधी सुरुवात होईल. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाऊ शकतो. अंतिम सामना कोलंबोला 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे खेळवला जाऊ शकतो. तसेच जर सुपर फोरमध्येही भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले, तर 10 सप्टेंबर रोजी कँडीमध्येच हा सामना होईल.

हे आशिया चषकाचे 16 वे पर्व आहे. या 16 व्या पर्वात होणाऱ्या एकूण 13 सामन्यांपैकी 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. तसेच अन्य 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तानमध्ये पहिल्या सामन्याव्यतिरिक्त 3 सप्टेंबर रोजी लाहोरला बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, 5 सप्टेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होईल. तसेच सुपर फोर फेरीतील एक सामनाही पाकिस्तानला होईल.

सहा संघात रंगणार स्पर्धा

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची सुपर सिक्स फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

एका गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत चार संघात साखळी फेरी खेळवली जाईल, यातून अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT