Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानची दैना करायला टीम इंडिया वापरणार हुकमी एक्का; जाणून घ्या कशी असेल भारताची प्लेइंग 11

Asia Cup 2023 IND vs PAK India Playing 11: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे.

Manish Jadhav

Asia Cup 2023 IND vs PAK India Playing 11: आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील पल्लेकेले येथे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जवळपास निश्चित मानला जात असताना भारतीय संघाबाबत मात्र अजूनही साशंकता आहे. केएल राहुलची एक्झिट संघासाठी खूप जड गेली आहे. त्यामुळे यष्टीरक्षकापासून फलंदाजांपर्यंत निर्णय घेणे कठीण झाले आहे.

ईशान किशनची एन्ट्री ठरली

केएल राहुल (KL Rahul) बाहेर पडल्यानंतर भारताची सर्वात मोठी समस्या यष्टिरक्षकाबाबत निर्माण झाली आहे. संजू सॅमसनला 17 जणांच्या संघात स्थान मिळू शकत नाही कारण राहुलला पूर्णपणे वगळण्यात आलेले नाही.

अशा स्थितीत संघाकडे फक्त काही पर्याय उरले आहेत. किशनने अद्याप वनडेत खालच्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही.

अशा स्थितीत त्याला पुन्हा एकदा ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. असे झाल्यास संघासमोर पहिला पर्याय असेल की रोहित आणि कोहली यांनी आपली बॅंटिंग ऑर्डर बदलावी आणि किशन-गिलने ओपनिंग करावी.

गिल टीम इंडियाचा हुकमी एक्का

शुभमन गिलला टीम इंडियाचा (Team India) हुकमी एक्का आहे. अशा परिस्थितीत त्याला बाहेर बसवणे टीम इंडियाला परवडू शकत नाही. कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

त्याचबरोबर श्रेयस अय्यर किंवा तिलक वर्मा यांना चौथ्या क्रमांकावर स्थान दिले जाऊ शकते. पाचव्या क्रमांकावर संघ हार्दिक पांड्याला मैदानात उतरवू शकतो.

दुसरीकडे, वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर रवींद्र जडेजा उतरेल.

हे खेळाडू गोलंदाजीची कमान सांभाळतील

गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल, दुखापतीतून परतलेल्या बुराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्व:ला सिद्ध करुन दाखवले आहे. मात्र, 50 षटकांच्या सामन्यात त्याचा फिटनेस अबाधित राहतो की नाही हे पाहावे लागेल.

कुलदीप यादव एकमेव फिरकी गोलंदाज असेल, अशा स्थितीत तिसर्‍या वेगवान गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांच्यात चुरस असेल.

गेल्या काही वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा अव्वल गोलंदाज असलेल्या मोहम्मद सिराजला वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT