IND vs PAK: भारतावर 'साई'कृपा! सुदर्शनने ठोकले शानदार शतक, पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव

Emerging Asia Cup 2023: एसीसी मेन्स इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये भारत A ने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला.
Sai Sudharsan
Sai SudharsanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Emerging Asia Cup 2023: एसीसी मेन्स इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये भारत A ने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 206 धावांचे लक्ष्य 36.4 षटकात 2 गडी गमावून सहज पार केले.

भारताकडून सलामीवीर साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकरने चमकदार कामगिरी केली. सुदर्शनने शानदार शतक ठोकले. त्याने 110 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. हंगारगेकरने 8 षटकांत 42 धावा देत 5 बळी घेतले.

साई सुदर्शनने तूफानी खेळी खेळली

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. सुदर्शन आणि अभिषेक शर्मा (20) यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकात अभिषेकला मुबासिर खानने बाद केले.

सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी निकिन जोस (53) सोबत 99 धावांची भागीदारी केली. मात्र, जोसला 31व्या षटकात मेहरान मुमताजने यष्टिचित केले. येथून सुदर्शन आणि कर्णधार यश धुल (नाबाद 20) यांनी आघाडी घेतली.

दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची शानदार भागीदारी केली. सुदर्शनने षटकार ठोकत भारताला (India) विजय मिळवून दिला. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

Sai Sudharsan
Emerging Asia Cup 2023: भारताकडून नेपाळचा 9 गडी राखून पराभव, 'या' दिवशी भिडणार IND-PAK

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा (Pakistan) संघ 48 षटकांत 205 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून कासिम अक्रम (48) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 63 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार मारले. सलामीवीर साहिबजादा फरहानने 35 धावा केल्या.

टेल बॅट्समन मुबासिर खानने 28 आणि मेहरान मुमताजने 25 धावांचे योगदान दिले. मुमताज नाबाद राहिला. हा ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना होता. भारत 50 षटकांच्या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

Sai Sudharsan
Emerging Women's Asia Cup 2023: श्रेयंकाची भन्नाट बॉलिंग! 2 धावात घेतल्या 5 विकेट्स, भारताने 32 चेंडूतच जिंकली मॅच

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना 21 जुलै रोजी बांगलादेशशी होणार आहे. दुसरीकडे, त्याच दिवशी पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना 23 जुलै रोजी कोलंबो येथे होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BCCI Refuses Trophy From Mohsin Naqvi
Mohsin Naqvi Trophy Chor Viral Video Dubai
Harmanpreet Kaur Record
IND vs PAK Women's T20 Asia Cup
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com