Anushka Sharma & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Captaincy resign: विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का झाली भावूक

पोस्टसोबत अनुष्काने (Anushka Sharma) विराटचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये विराटने भारताची टेस्ट जर्सी घातली असून मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया सातत्याने समोर येत आहेत. क्रिकेटमधील दिग्गजांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी कोहलीला कर्णधार म्हणून उत्तम कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आता विराटची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) देखील आता एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने विराटच्या कर्णधार झाल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व आठवणी शेअर केल्या आहेत. या लांबलचक पोस्टसोबत अनुष्काने विराटचा (Virat Kohli) एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये विराटने भारताची टेस्ट जर्सी घातली असून मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.

विराटप्रमाणेच अनुष्कानेही तिच्या पोस्टमध्ये धोनीचा उल्लेख केला आहे. मात्र, याशिवाय अनुष्काने इतर कोणत्याही खेळाडूबद्दल लिहिलेले नाही. 'या सात वर्षांचे धडे आमची मुलगी तिच्या वडिलांमध्ये बघेल.'

अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला 2014 सालातील तो दिवस आठवतो जेव्हा तू मला सांगितले होते की, तुला कर्णधार बनवण्यात आले आहे, कारण धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

''मला आठवतंय त्या दिवशी धोनी आपल्याबरोबर बोलत असताना गमतीने म्हणाला होता की बघा किती लवकर तुमची दाढी पांढरी व्हायला लागेल. त्या दिवशी आपण सगळे खूप हसलो होतो."

"त्या दिवसापासून, मी तुझी दाढी राखाडी होण्यापर्यंत पाहिले. मी वाढही पाहिली आहे. आणि हो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझ्या प्रगतीचा आणि नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. परंतु तु स्वतःमध्ये जी प्रगती केली त्याचा मला अधिक अभिमान आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT