भारतीय क्रिकेट विश्वात शनिवारी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून सर्वांनाच मोठा धक्का दिला. कोहलीच्या या निर्णयानंतर माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटसाठी भारतीय कसोटी संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण होऊ शकतो याबद्दल सांगितले. डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पद सोडण्याचा आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी केएल राहुलची कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे गावस्कर यांनी स्वागत केले होते. तसेच विराट कोहलीनंतर आता कसोटी संघाचा कर्णधार म्हणून ऋषभ पंतचे (Rishabh Pant) नाव सुचवले होते. रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) यांना कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले असले तरी, भारतीय थिंक टँकने ऋषभ पंतला कसोटी संघाचा कर्णधार बनविण्याचा विचार करावा, असे गावस्कर यांनी सुचवले.
गावसकर म्हणाले की, भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराच्या निवडीबाबत निवड समितीमध्ये बरीच चर्चा होणार आहे. तुम्ही मला विचाराल तर मी एवढेच सांगेन की, मी भारताचा पुढचा कर्णधार म्हणून ऋषभ पंतकडे पाहीन.
दरम्यान, रोहित शर्माचे उदाहरण देताना गावस्कर म्हणाले की, ''जेव्हा रोहित शर्माला रिकी पाँटिंगनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले तेव्हा त्याच्या फलंदाजीत कमालीचे बदल झाले होते. अचानक कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याने आपल्या 30,40 धावांचे 50 आणि नंतर 150,200 मध्ये रुपांतर करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर तो शानदार फलंदाजीला सुरुवात करेल, तसेच केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या डावात झळकावलेल्या शतकाचाही त्याला खूप फायदा होईल, असे मला वाटते.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.