आरपीएसजी व्हेंचर्सने लखनऊ संघ विकत घेतल्यानंतर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा एकदा चर्चेत  Dainik Gomantak
क्रीडा

संजीव गोएंका यांनी IPL चा संघ खरेदीकेल्यानंतर, BCCI अध्यक्ष आरोपांच्या पिंजऱ्यात

आरपीएसजी (RPSG) व्हेंचर्सने लखनऊ संघ विकत घेतल्यानंतर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप होत आहेत.

दैनिक गोमन्तक

बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप होत आहेत. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण आरपीएसजी व्हेंचर्सने लखनऊ (RPSG Ventures Lucknow) संघ विकत घेतल्यानंतर उद्भवले आहे. गांगुली इंडियन फुटबॉल लीग संघ मोहन बागानच्या मालकीपासून वेगळे होऊ शकतात. तसे संकेत संजीव गोएंका (Sanjeev Goenka) यांनी देखील दिले आहेत.

BCCI ने IPL 2022 साठी दोन नवीन संघांची नावे जाहीर केली. RPSG व्हेंचर्सने लखनौ फ्रँचायझीसाठी बोली जिंकली होती. ATK मोहन बागानचे मुख्य मालक संजीव गोयंका यांनी एका माध्यमाला सांगितले, सौरव गांगुली हे दोन मंडळांमध्ये पदावर आहेत, त्यातील हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी बोर्डाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोएंका म्हणाले, मला वाटते की सौरव गांगुली मोहन बागानपासून पूर्णपणे वेगळे होणार आहेत. पण याची घोषणा गांगुली स्वत:च करतील. हे बोलल्यानंतर गोएंका यांच्या लक्षात आले ते थोडे जास्तच बोलून गेले त्यानंतर त्यांनी ते सावरुन घेत यावर शंका व्यक्त करत त्यांनी लगेच माफीही मागितली.

सौरव गांगुली मोहन बागान का सोडणार? कोलकाता गेम्स अँड स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे एटीकेएमबी संघाचे मालक आहेत. अधिकृत माहितीनुसार, हे सौरव गांगुली संजीव गोएंका, हर्षवर्धन आणि उत्सव पारेख यांच्या सह-मालकीचे आहे. सौरव गांगुली यांची येथे संचालक म्हणूनही निवड करण्यात आली आहे.

एका माध्यमाशी झालेल्या संभाषणात, बीसीसीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले – ही बाब संपूर्ण हितसंबंधांच्या संघर्षाची आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

सौरव गांगुली या क्लबपासून वेगळे होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांच्याकडूनही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

सीव्हीसी व्हेंचर्सचा व्यवहार धोक्यात? RPSG व्हेंचर्स आणि सौरव गांगुली यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष असताना, CVC कॅपिटल व्हेंचर्सने अहमदाबाद संघ खरेदी करण्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीव्हीसी कॅपिटलच्या अहमदाबाद टीमसाठीचा करार खंडित होऊ शकतो. कारण त्यांच्यावर सट्टा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. असे अनेक अहवालांमधून समोर आले आहे.

याबाबत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांना विचारले असता ते म्हणाले, आतापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT