IPL 2022: अहमदाबाद संघ CVC कडे तर लखनौ RPSG ग्रुपने केला खरेदी!

जिथे आता आयपीएलमध्ये (IPL) 8 नाही तर 10 संघ खेळताना दिसणार आहेत. दोन नवीन संघांसाठी, बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे, ज्यासाठी बोली लागली होती.
IPL
IPLTwitter/ @IPL
Published on
Updated on

दुबईमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार थांबताच, आयपीएलशी संबंधित एका मोठ्या बातमीने खळबळ उडाली आहे. आज आयपीएलमधील दोन नवीन संघांची घोषणा झाली. आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत तुम्ही 8 संघांमधील अटीतटीची लढाई पाहिली असेल. परंतु 2022 चा हंगाम थोडा वेगळा असणार आहे. जिथे आता आयपीएलमध्ये 8 नाही तर 10 संघ खेळताना दिसणार आहेत. दोन नवीन संघांसाठी बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली होती, ज्यासाठी आज बोली पार पडली. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ असतील. CVC कॅपिटल पार्टनर्सला अहमदाबाद तर RPSG ग्रुपने लखनौ संघाची खरेदी केली आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार लखनौ संघावर सात हजार कोटींची बोली लागली असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे अहमदाबाद संघासाठी पाच हजार कोटींची बोली लागली.

अहवालानुसार, दोन नवीन संघांसाठी 10 निविदा काढण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, आरपीएसजी, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिडोज यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत. अहवालांनुसार, अहमदाबाद, इंदूर आणि लखनौ येथून संघ खरेदी करण्यासाठी उच्च स्पर्धा आहे.

IPL
T20 World Cup: पत्रकाराच्या प्रश्नावर विराटने लावला डोक्याला हात; पाहा Video

#2 बीसीसीआयच्या टीमच्या वतीने 10 निविदांची चौकशी सुरु झाली आहे. जो कोणी बीसीसीआयचे सर्व मापदंड पूर्ण करेल, तो संघाचा मालक बनण्याचा हक्कदार असणार आहे. तांत्रिक बोलीची छाननी केल्यानंतर आर्थिक बोली खुली होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पर्यंत 2 नवीन संघांची घोषणा होण्याची शक्यता होती.

दरम्यान, एमएस धोनीचे (MS Dhoni) काम पाहणारी कंपनी रिती स्पोर्ट्सने देखील आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. याशिवाय अमृत लीला एंटरप्रायझेस या आणखी एका कंपनीने बोली लावली होती. आयपीएल संघांच्या लिलावात या दोन कंपन्यांची बोली धक्कादायक ठरली आहे. धोनीचे काम पाहणाऱ्या रिती स्पोर्ट्स या कंपनीला अपात्र ठरवण्यात आले आहे. याचा अर्थ ती आता संघ विकत घेण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. संघ विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी समूह पुढे सरकताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com