IPL 2022 10 संघमध्ये होणार, लवकरच जाहिर होणार दोन नवीन संघांची नावे

निविदा कागदपत्रे ऑगस्टच्या अखेरीस जारी केली जाऊ शकतात आणि बीसीसीआय ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दोन्ही संघांना अंतिम स्वरूप देऊ शकते. असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल.
आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल. Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले आहे की यूएईमध्ये आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात 8 संघ खेळण्याची ही शेवटची वेळ असेल. आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल. असे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ (BCCI Treasurer Arun Dhumal) यांनी स्पष्ट केले आहे.

धूमळ म्हणाले, बीसीसीआय निविदा प्रक्रियेवर काम करत आहे, ती लवकरच जारी केली जाईल. “प्रत्येकजण आता आयपीएलकडे पाहत आहे. आम्हाला विश्वास आहे की युएईमध्ये होणारा हा दुसरा टप्पा रोमांचक असेल. आठ संघांमध्ये खेळण्यात येणारा हा आयपीएलचा शेवटचा हंगाम असेल. पुढील वेळी आयपीएल ही 10 संघ होईल. त्यावर काम करत आहोत.

आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल.
Covid-19 च्या पार्श्वभुमीवर BCCI ने केले IPL च्या नियमात मोठे बदल

ऑगस्टच्या अखेरपर्यंत होऊ शकते दोन नवीन संघांची घोषणा

दोन नवीन संघ केव्हा निश्चित केले जातील याबाबत धुमाळ यांना विचारण्यात आले असता त्यांनी या विषयावर सविस्तर बोलण्यास नकार दिला. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, निविदा कागदपत्रे ऑगस्टच्या अखेरीस जारी केली जाऊ शकतात आणि बीसीसीआय ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दोन्ही संघांना अंतिम स्वरूप देऊ शकते. नवीन संघांसाठी बोली प्रक्रिया संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम सामन्याच्यावेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयपीएल 2022 जास्त सामने आणि आधिक मोठे होणार आहे. कारण आता आयपीएल एकूण संघात 10 खेळविण्यात येईल.

आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल.
IPL च्या नव्या हंगामात अहमदाबाद संघासाठी आदानी ग्रुप इच्छुक

नवीन संघाची किंमत काय असावी?

बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न हा आहे की निविदेत मूळ किंमत काय असावी. गेल्या वर्षीपर्यंत बीसीसीआय नवीन आयपीएल संघांसाठी मूळ किंमत म्हणून 1500 कोटी ठेवण्याची योजना आखत होती, परंतु राजस्थान रॉयल्समध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड गुंतवणुकीने संपूर्ण समीकरण बदलले आहे. गुंतवणूकदार कंपनी रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी राजस्थान रॉयल्समध्ये 15 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सने फुटबॉल क्लब लिव्हरपूलची मालकी असलेल्या कंपनीमध्ये आणि बेसबॉल संघ बोस्टन रेड सॉक्समध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा व्यवहार स्पष्टपणे सूचित करतो की नवीन आयपीएल संघांची मूळ किंमत 2000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.

पण आयपीएलमधील पहिले 8 संघ सुरुवातीला 2008 मध्ये विकले गेले होते, तेव्हा त्याची मूळ किंमत 50 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी होती. (त्या वेळी एक डॉलरची किंमत 35 रुपये होती).

आयपीएल 2022 निश्चितपणे 10 संघांसह (IPL 2022 definitely with 10 teams) खेळले जाईल.
Afghanistan: सुरु असलेल्या घडामोडीनंतर, IPL च्या 'या' संघासाठी मोठी बातमी

2008 मध्ये आयपीएलमधील 8 संघांची रक्कम पुढीलप्रमाणे:

मुंबई इंडियन्सला अंबानींनी 111.9 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले.

आरसीबी - 111.6 मिलियन डॉलर्स

डेक्कन चार्जर्स - 107 मिलियन डॉलर्स

चेन्नई सुपर किंग - 91 मिलियन डॉलर्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स - 84 मिलियन डॉलर्स

किंग्ज इलेव्हन पंजाब - 76 मिलियन डॉलर्स

कोलकाता नाइट रायडर्स - 75.09 मिलियन डॉलर्स

राजस्थान रॉयल्सला - 67 मिलियन डॉलर्स

संघ विकत घेण्यास या कंपनी इच्छुक

गेल्या 12 महिन्यांपासून कोलकातामधील आरपी-संजीव गोयंका ग्रुप आणि अहमदाबादमध्ये असलेला अदानी ग्रुप आयपीएलमध्ये संघ खरेदीस उत्सुक आहेत. परंतु आता निविदा निघाल्यावर दोन नवीन संघांची मालकी कोणाकडे असेल ते नक्की होईल. याशिवाय, एक मोठी गोल्ड फायनान्स कंपनी देखील हैदराबादच्या एका फार्मा कंपनीसोबत आयपीएलचा संघ विकत घेण्यास इच्छुक आहे. पण एकदा बीसीसीआयने औपचारिकपणे निविदा काढली की, आयपीएलमध्ये सामील होण्यासाठी आणखी नावे संपूर्ण आशियामध्ये येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com