Zlatan Ibrahimovic Dainik Gomantak
क्रीडा

Zlatan Ibrahimovic retire: दिग्गज फुटबॉलर झ्लाटनचा 24 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा; भावनिक भाषणाचा Video व्हायरल

स्वीडन आणि एसी मिलानचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविकने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Zlatan Ibrahimovic retire: स्वीडन आणि एसी मिलानचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविकने रविवारी (4 जून) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने भावूक करणारे भाषण करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.

चालू हंगामानंतर झ्लाटनचा एसी मिलानबरोबरचा करार संपणार होता. त्यामुळे आता 41 वर्षीय झ्लाटनने आपल्या प्रोफेशनल फुटबॉल कारकिर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या या निर्णयाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे सर्वांनाच जेव्हा रविवारी त्याने सांगितले, तेव्हा आश्चर्य वाटले. त्याला यावेळी खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.

मिलान क्लबने हेलास वेरोनाविरुद्धच्या सामन्यानंतर झ्लाटनसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान झ्लाटनला निरोप देण्यात आला. वेरोनाविरुद्धच्या सामन्यानंतर झ्लाटनने पत्रकारपरिषदेत सांगितले की त्याच्या निवृत्तीबद्दल कोणालाच माहिती नव्हते.

तो म्हणाला, 'अगदी माझ्या कुटुंबालाही माहित नव्हते. कारण मला ही गोष्ट सर्वांसमोर एकाचवेळी सांगायची होती.'

झ्लाटन त्याच्या निवृत्तीवेळी भावूकही झाला होता, तसेच त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. त्याच्या चाहत्यांनी यावेळी त्याच्या नावाने मोठा गजरही केला. त्यानेही त्यांना हाताने हृदयाचा आकार तयार करत दाखवला आणि त्याने फ्लाईंग किसही दिले.

झ्लाटनने 1999 झाली याने प्रोफेशनल कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो एसी मिलान व्यतिरिक्त मालमो एफएफ, एजाक्स अमस्टरडॅम, मँचेस्टर युनायटेड, पॅरिस सेंट-जर्मेन, इंटर मिलान या क्लबकडूनही फुटबॉल खेळला.

पण गेल्या काही महिन्यांपासून तो दुखापतींचा सामना करत होता. निवृत्तीची घोषणा करताना झ्लाटन म्हणाला, 'या स्टेडियममध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. पहिल्यांदा मी आलो तेव्हा तुम्ही मला आनंद दिला, दुसऱ्यांदा मला प्रेम दिले.'

तसेच त्याने कुटुंबाचे, सर्व संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, सपोर्ट स्टाफचे आणि चाहत्यांचेही आभार मानले.

त्याने अखेरीस सांगितले की 'हे खूप कठीण आहे, पण सध्या माझ्या मनात भावनांचा कल्लोळ झाला आहे. पण मी म्हणेल की तुम्ही भाग्यवान असाल तर मी तुम्हाला आजूबाजूला नक्की भेटेन.'

वेरोनाच्या चाहत्यांकडून हूटिंग

दरम्यान, तो त्याच्या निवृत्तीचे भाषण देत असताना वेरोनाच्या चाहत्यांनी त्याची खिल्लीही उडवली. पण त्याचेही त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, 'तुम्ही खिल्ली उडवत राहा, पण यावर्षातील हा सर्वात मोठा क्षण आहे, की तुम्ही मला पाहात आहात.'

झ्लाटनने मिलानसाठी 163 सामन्यांमध्ये 93 गोल केले आहेत. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 561गोल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT