Lionel Messi last match for PSG: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी गेली दोन वर्षे पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाकडून खेळत होता. पण आता या क्लबचा मेस्सीने निरोप घेतला आहे. मेस्सीने शनिवारी पीएसजीकडून क्लेरमाँटविरुद्ध लीग-1 मधील अखेरचा सामना खेळला. पण या सामन्यात पीएसजीला 2-3 अशा गोल फरकाने पराभव स्विकारावा लागला.
दरम्यान, सर्जिओ रामोससाठीही हा पीएसजीकडून अखेरचा सामना होता. विशेष म्हणजे त्याने पीएसजीला या सामन्यात पहिला गोलही करून दिला होता. मेस्सीला मात्र या सामन्यात गोल करण्यात यश आले नाही.
बार्सिलोनाबरोबर मार्ग वेगळे झाल्यानंतर मेस्सी 2021 मध्ये पीएसजीमध्ये सामील झाला होता. पीएसजीकडून तो गेल्या दोन हंगामात 75 सामन्यांमध्ये 32 गोल केले. तसेच 35 असिस्ट केले.
पीएसजीकडून अखेरचा सामना खेळल्यानंतर मात्र मेस्सीची प्रेक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली. जेव्हा मेस्सीचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा चाहत्यांनी त्याची हुटिंग केली. पण त्यानंतर काही वेळात मेस्सीने त्याच्या तिन्ही मुलांना घेऊन मैदानात आला.
क्लेरमाँटविरुद्धच्या सामन्यापूर्वी मेस्सीचा पीएसजीबरोबरचा प्रवास संपणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्याबद्दल पीएसजीचे पीएसजीचे अध्यक्ष नासेर अल-खेलेफी म्हणाले, 'त्याचे पॅरिस सेंट-जर्मेन आणि लीग 1 मधील योगदान कमी लेखले जाऊ शकत नाही. आम्ही लिओ आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.'
मेस्सीने पीएसजीच्या वेबसाईटला सांगितले की 'मी या दोन वर्षांसाठी क्लबचे, पॅरिस शहराचे आणि त्यांच्या लोकांचे आभार मानतो. मी तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.'
दरम्यान, आता मेस्सी भविष्यात कोणत्या संघाकडून खेळणार या प्रश्नाचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. सध्या तो ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणेच सौदी अरेबियात फुटबॉल खेळू शकतो, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच तो पुन्हा बार्सिलोना संघात परतू शकतो, अशी चर्चाही होत आहे. त्यामुळे मेस्सी भविष्यात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.