Hockey Junior Asia Cup 2023: पाकिस्तानला हरवून भारताने रचला इतिहास, जेतेपदावर कोरले नाव!

India vs Pakistan: आठ वर्षांनंतर होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते.
Hockey Junior Asia Cup 2023 India vs Pakistan
Hockey Junior Asia Cup 2023 India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Hockey Junior Asia Cup 2023 India vs Pakistan: ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून इतिहास रचला आहे.

भारताने ज्युनियर हॉकी आशिया कपचे विजेतेपद चार वेळा जिंकले. आठ वर्षांनंतर होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते.

सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानी संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने गेममध्ये आपले वर्चस्व अबाधित ठेवले.

या खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली

पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. भारताकडून अंगद बीर सिंगने 12व्या मिनिटाला, अरिजित सिंग हुंदलने 19व्या मिनिटाला गोल केले, तर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांच्या प्रशिक्षित पाकिस्तान संघासाठी बशारत अलीने 37व्या मिनिटाला गोल केला.

Hockey Junior Asia Cup 2023 India vs Pakistan
Junior Badminton Tournament: देविका सिहागला दुहेरी किताब जिंकण्याची संधी

चौथ्यांदा विजेतेपद पटकावले

भारताने 2004, 2005 आणि 2015 नंतर चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तान 1987, 1992 आणि 1996 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. याआधी तीनदा ज्युनियर पुरुष हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.

1996 मध्ये पाकिस्तान जिंकला होता, तर 2004 मध्ये भारत (India) विजयी झाला होता. मलेशियामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 6-2 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते.

8 वर्षांनंतर स्पर्धा होत आहे

ज्युनियर हॉकी आशियाई चषक आठ वर्षांनंतर आयोजित करण्यात येत आहे. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे त्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. पहिल्या क्वार्टरमध्येच पाकिस्तानच्या गोलवर अनेक हल्ले करत भारताने आक्रमक सुरुवात केली.

अंगद बीरने 12 व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने चेंडू आपल्याकडेच ठेवला.

Hockey Junior Asia Cup 2023 India vs Pakistan
Hockey Pro League साठी टीम इंडियाची घोषणा, 'हा' खेळाडू करणार कॅप्टन्सी; कोणाविरुद्ध होणार मॅच जाणून घ्या

भारतीय खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले

अरिजितने 19 व्या मिनिटाला दुसरा मैदानी गोल करत भारतीय फॉरवर्ड लाइनची शानदार चाल पूर्ण केली. हा त्याचा स्पर्धेतील आठवा गोल ठरला.

हाफ टाईमच्या आधी पाकिस्तानच्या शाहीद अब्दुलने सुवर्णसंधी निर्माण केली, पण त्याचा गोलसमोरचा फटका भारतीय गोलरक्षक मोहित एचएसने चतुराईने वाचवला.

दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानी संघाने आक्रमक पुनरागमन केले आणि तिसऱ्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटाला त्याचा फायदा मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com