whatsapp crush is following you Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुमचा क्रश तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपवर फॉलो करतोय, 'असं' ओळखा त्याला

अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता की तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करत आहे

दैनिक गोमन्तक

प्रत्येक नात्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्ती बद्दल जास्त जाणून घ्यायचे असते. तेही जेव्हा नातं प्रेमाचं असतं, तेव्हा त्यांच्याबद्दल अधिक समजून घ्यावंसं वाटतं. यासाठी अनेक जन सोशल मीडियाचा (social media) वापर करतात. त्यांचे फोटो, त्यांची आवड, न आवडणाऱ्या काही गोष्टी येथे जाणून घ्यायचा अनेकांचा प्रयत्न असतो. कधी-कधी तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फॉलो करत असतो आणि तुम्हाला माहिती ही नसते. अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता की तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करत आहे.

अनेकदा असं होतं की आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटतं. आपण काय बोलावे याचा विचार करतो. त्याचप्रमाणे जर कोणी तुमच्यासाठी काही मेसेज टाईप करून डिलीट करत असेल आणि असे वारंवार होत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. कदाचित समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावर क्रश असेल. त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे पण ते सांगता येत नाही.

प्रोफाइल फोटोत होणार बदल आणि येणारा मेसेज

जर तुम्ही तुमचा प्रोफाईल पिक्चर बदलला असेल आणि लगेचच त्याचा मेसेज आला आणि तो तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारू लागला, तर याचा अर्थ असा होतो की तो तुमच्यावर नजर ठेवत आहे. तो तुमची प्रत्येक छोटी गोष्ट काळजीपूर्वक पाहतो. त्यामुळे प्रोफाइल पिक्चर बदलताच त्याचा मेसेज लगेच येतो. तुमच्याही अशाच काही गोष्टी लक्षात आल्या असतील तर समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घ्यायला हवे. कदाचित त्याचा तुमच्यावर क्रश असेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिस कॉल

जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (whatsapp) कॉल केला तर लगेच तो कट करा. जेव्हा तुम्ही त्याला कारण विचारता तेव्हा तो म्हणतो की त्याची चुकून लागला गेला आणि जेव्हा असे पुन्हा पुन्हा होते तेव्हा समजले पाहिजे की काहीतरी चुकीचे आहे. जर तुमच्याही व्हॉट्सअॅपवर मिस्ड कॉलच्या चुका लक्षात आल्या असतील आणि त्या वारंवार घडत असतील, तर या चुका पुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा तुमच्यावर क्रश असण्याची शक्यता आहे, त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.

त्याला मेसेज करताच त्याला लगेच ब्लू टिक होते आणि तो त्याला रिप्लाय देऊ लागतो. यावरून तुम्ही समजू शकता की त्यांचा तुमच्यावर क्रश असू शकतो आणि ते तुमच्यासाठी धडपडत आहे. मेसेज केल्यानंतर लगेच ब्लू टिक म्हणजे तो ऑनलाइन आहे आणि लगेच तुम्हाला उत्तर म्हणजे ते तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे. यावरून तो तुम्हाला जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी किती उत्सुक आहे हे समजू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, वार्का येथील घटना; संशयिताचा जामीन गोवा खंडपीठाने फेटाळला

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्रातून दुःखद बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

SCROLL FOR NEXT