महिलांचे वाढते वजन अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचे कारण

महिलांनी लठ्ठपणापासून 'अशी' मिळवावी मुक्ती
obesity women
obesity womenDainik Gomantak
Published on
Updated on

लठ्ठपणाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. लठ्ठपणा सामान्यत: हालचालींचा अभाव, निष्क्रिय जीवनशैली, आहाराच्या सवयी, हार्मोनल बदल इत्यादी कारणांमुळे असू शकतो. लठ्ठपणामुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो.

चालणे, उठणे, बसणे आणि अगदी त्यांना इतरही दैनंदिन समस्या येऊ शकतात. एवढेच नाही तर वाढत्या वजनामुळे मनावरही वाईट परिणाम होतो. अतिरिक्त लठ्ठपणामुळे (Obesity) महिलांमध्ये तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक समस्या दिसून येतात.

obesity women
गोव्यात हिंदू संस्कृती जपण्यात छत्रपतींचा मोठा वाटा; मुख्यमंत्री सावंत

लाखो स्त्रिया जीवघेण्या आजारांना बळी पडतात आणि केवळ लठ्ठपणामुळे आपला जीव गमावतात. लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा (Heart disease) झटका, कर्करोग, गर्भधारणेच्या समस्या, कोलेस्ट्रॉल यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच महिलांनी सक्रिय जीवन जगणे महत्त्वाचे आहे.

लठ्ठपणापासून अशी मिळवा मुक्ती

अधिकाधिक हिरव्या भाज्या, फळे, प्रथिनेयुक्त आहारचे सेवन करा.

भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा आणि त्याचे अनुसरण करा.

सकाळी हलका नाश्ता करण्याचा प्रयत्न करा.

जंक फूड आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com