Breast Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breast Cancer: आता 'ब्रा' शोधणार स्तनाचा कर्करोग!

Breast Cancer: तुर्की येथील एका शास्त्रज्ञाने ब्रेस्ट ट्यूमर शोधू शकणारी ब्रा विकसित केली आहे.

दैनिक गोमन्तक

Breast Cancer: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार 2020 मध्ये सुमारे 685 हजार महिलांचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. जगभरात स्तनाच्या कर्करोगाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त असून. या आजाराचा वेळीच उपचार झाले नाहीत तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

तुमच्या ब्रा मधून तुमच्या आत वाढणाऱ्या या धोकादायक आजाराची झलक तुम्हाला मिळाली तर काय होईल याची कल्पना करा. तुर्की येथील एका शास्त्रज्ञाने ब्रेस्ट ट्यूमर शोधू शकणारी ब्रा विकसित केली आहे.

तुर्की येथील शास्त्रज्ञ

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) मीडिया लॅबमध्ये या ब्राचं डिझाईन शास्त्रज्ञ डॉ.जानन दडेविरेन यांनी तयार केले आहे. त्यांच्या मावशीचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगाने झाला होता. म्हणून अशी ब्रा डिझाईन करण्याची कल्पना त्यांना आली.

अशी आहे ब्रा ची रचना?

ब्रामध्ये सहा हनीकॉम्ब-आकाराचे खोबणी तयार केली आहेत, ज्यामध्ये एक लहान अल्ट्रासाऊंड कॅमेरा जोडला जाऊ शकतो. अल्ट्रासाऊंड जेलचा वापर न करता, हा कॅमेरा वेगवेगळ्या स्लॉटमध्ये ठेवून स्तनाची सर्व बाजूंनी तपासणी करता येते. ज्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो त्यांना वारंवार मॅमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो.

ही ब्रा 0.3 सेमी एवढी लहान ट्यूमर शोधू शकते

डॉ डेडेविरेन यांच्या मते, ही ब्रा 0.3 सेमी एवढी लहान ट्यूमर शोधू शकते. ट्यूमर खूप लहान सुरू होतात. स्तनातील विकृती शोधण्यात ही ब्रा अत्यंत अचूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या ब्राच्या माध्यमातून कोणतीही असामान्य क्रिया आढळल्यास मॅमोग्राम करावा लागेल.

सुमारे 83 हजार रुपये ब्रा ची किंमत

हे उपकरण तयार करण्यासाठी एमआयटी टीमला सुमारे साडेसहा वर्षे लागली. ऑगस्ट 2023 मध्ये यूएस मध्ये पेटंट प्राप्त झाले आणि सध्या मानवांवर चाचणी केली जात आहे. एका उपकरणाची किंमत 1000 डॉलर (सुमारे 83 हजार रुपये) असेल. पण जेव्हा त्याचे उत्पादन वाढेल तेव्हा किंमत कमी होईल. मात्र यास सुमारे 5 वर्षे लागतील. हे उपकरण सुरुवातीला स्तनाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या स्त्रियांना दिले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT