पावसाळा हा ऋतू अनेक आजार आणि इन्फेक्शन्स सोबत घेऊन येतो. हवामानात बदल झाल्यावर किंवा वातावरणात गारवा निर्माण झाल्यावर अनेकांना ताप येतो. जर तुम्हालाही ताप येत असेल तर नक्की या टेस्ट करा आणि आवश्यक ती काळजी घ्या. सगळ्यांचा आवडता ऋतू म्हणजेच पावसाळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत असतात. तर याउलट अनेकांना पाऊस नको नकोसाही वाटतो. त्याच कारण पाऊस सोबतच अनेक आजार, घाण आणि इन्फेकशन्स घेऊन येत असतो. (Fever In Monsoon)
पाऊस चालू झाल्यानंतर निसर्गप्रेमी आवडणाऱ्या ठिकाणी भटकंती करायला जातात.पण सर्वाना आवडणारा हवाहवासा वाटणारा पाऊस सोबत अनेक आजार घेऊन येते. पावसाळ्यात अनेकांना मोठ्या प्रमाणावर ताप येतो (Fever In Monsoon). जर तुम्हालाही पावसाळ्यात ताप येत असेल तर सतर्क व्हा आणि आवश्यक त्या टेस्ट करून घ्या. कारण हा ताप अनेक आजारांचे लक्षण असू शकते. हे आजार ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट करायच्या हे अवश्य जाणून घ्या.
१) चिकनगुनिया (Chikungunya)
जास्त ताप येणे हे चिकनगुनिया या आजाराचे देखील लक्षण असू शकत. जर ताप 3 ते 4 दिवस जात नसेल आणि वारंवार अंगदुखीची समस्या जाणवत असेल तर हे चिकनगुनियाचे लक्षण असू शकते. अशा वेळी तुम्ही हलगर्जीपणा न करता त्वरित आवश्यक ते उपचार घेतले पाहिजेत. यासाठी तुम्ही चिकनगुनिया आयजीएम टेस्ट करून घ्यावी.
२) डेंग्यू (Dengue)
पावसामुळे जागोजागी आणि कोणत्याही वेस्ट गोष्टींमध्ये पाणी साचून राहते. घराच्या आजुबाजूला देखील अनेक ठिकाणी पाणी साचलेले असते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात डासांच्या प्रमाणात वाढ होत असते. डासांमुळे डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये तापाचा देखील समावेश असतो. जर तुम्हाला पावसाळ्यात ताप आला असेल तर त्वरित डेंग्यूच्या टेस्ट करून घ्या. अशा वेळी तुम्ही NS1 डेंग्यू अँटीजेन डिटेक्शन आणि डेंग्यू IgM टेस्ट करावी.
३) टायफाइड (Typhoid)
पावसाळ्यात होणाऱ्या मुख्य आजारांपैकी एक आजार म्हणजे टायफाइड. पावसाळ्यात ताप आला असेल तर हे टायफाइडचे लक्षण देखील असू शकते. यामुळे फक्त ताप आला आहे आणि आपण घरीच औषध घेणं असे न करता डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करावेत. जर लक्ष नाही दिले आवश्यक औषध उपचार नाही घेतले तर टायफाइड हा आजार वाढेल. अशा वेळी तुम्ही रॅपिड टायपी आयजीएम टेस्ट अवश्य करावी. यासोबतच तुम्ही विडाल टेस्ट देखील करु शकता.
४) मलेरिया (Malaria)
प्लाझमोडियम वायवॅक्स हा डास चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास सांडपाण्यावर मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळेच पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमध्ये मलेरियाचा देखील समावेश होतो. अशा वेळी तुम्हाला ताप येणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे मलेरियाची असतात. अशा वेळी तुम्ही रॅपिट अँटीजन डिटेक्शन टेस्ट करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.