Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

ICC Bans Saliya Saman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (15 ऑगस्ट) श्रीलंकेचा माजी खेळाडू सालिया समन याच्यावर कठोर कारवाई केली.
ICC Bans Saliya Saman
Sri Lankan Cricketer BanDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Bans Saliya Saman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (15 ऑगस्ट) श्रीलंकेचा माजी खेळाडू सालिया समन याच्यावर कठोर कारवाई केली. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने (Anti-Corruption Tribunal) सालिया समनला अमीरात क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या गुन्ह्यामुळे त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण?

सालिया समनवर 2020 मध्ये झालेल्या अबू धाबी टी10 लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्यासोबत इतर सात लोकांवरही सप्टेंबर 2023 मध्ये आरोप ठेवण्यात आले होते, ज्यानंतर त्यांच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून सालिया समनवर तात्पुरती बंदी लागू होती. आता आयसीसीने (ICC) त्याला दोषी ठरवून कायमस्वरुपी 5 वर्षांची बंदी घातली. ही बंदी 13 सप्टेंबर 2023 पासून लागू होईल. म्हणजेच, त्याने या बंदीचा 2 वर्षांचा कालावधी आधीच पूर्ण केला आहे.

ICC Bans Saliya Saman
Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

कोणत्या नियमांचे उल्लंघन?

आयसीसीने सालिया समनला तीन प्रमुख नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

नियम 2.1.1: सामन्याच्या किंवा सामन्याच्या काही भागांमध्ये फिक्सिंग करणे, षड्यंत्र रचणे किंवा अयोग्य मार्गाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे.

नियम 2.1.3: भ्रष्ट कृत्याच्या बदल्यात इतर कोणत्याही सहभागी व्यक्तीला बक्षीस देण्याची थेट किंवा अप्रत्यक्षपणे ऑफर देणे.

नियम 2.1.4: नियमांचे उल्लंघन करण्यासाठी कोणत्याही सहभागी व्यक्तीला थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रवृत्त करणे, फूस लावणे, निर्देश देणे किंवा मदत करणे.

या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

सालिया समनची कारकीर्द

सालिया समन हा श्रीलंकेच्या (Sri Lanka) देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सामने खेळले आहेत. यामध्ये 101 प्रथम श्रेणी (First-Class), 77 लिस्ट-ए आणि 47 टी20 सामन्यांचा समावेश आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याने शेवटचा सामना मार्च 2021 मध्ये श्रीलंकेतील एका टी20 स्पर्धेत खेळला होता. यानंतर त्याला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.

ICC Bans Saliya Saman
ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

आयसीसीचा कठोर संदेश

आयसीसीने अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. क्रिकेटमधील कोणताही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने (Anti-Corruption Unit) या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे क्रिकेटला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आयसीसीची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे. सालिया समनवर लावण्यात आलेली ही बंदी क्रिकेट जगतासाठी एक गंभीर इशारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com