मडगावमधील प्रभाग 14 मध्ये मलेरिया, डेंग्यूविरोधी उपाययोजना

मालभाट, पाजीफोंड परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ
Malaria Dengue preventive Measures in Ward 14 in Margao
Malaria Dengue preventive Measures in Ward 14 in MargaoDainik Gomantak

सासष्टी : मडगावमधील प्रभाग 14 मध्ये आज मलेरिया व डेंग्यूविरोधी उपाययोजना म्हणून फॉग फवारणी करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य खात्याचे, नगरपालिकेचे कर्मचारी तसेच स्वतः या प्रभागमधील नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर उपस्थित होत्या.

Malaria Dengue preventive Measures in Ward 14 in Margao
होली स्पिरिट चर्चमध्ये चोरी; दीड लाखांची रोकड लंपास

मालभाट व पाजीफोंड येथे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. पावसाला सुरवात झाल्यापासून या रोगांचे रुग्ण या परिसरात सापडले आहेत. मात्र, उपाययोजना व लोकांमध्ये जागृती करून रोगाच्या फैलावाला रोख लावण्यात यश मिळाले आहे, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यो रोगाचे प्रमाण इतर भागात पसरू नये म्हणून उपाययोजना केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी आरोग्य खात्याचे आभार मानले. प्रभाग १५ मधील पीक अप स्टॅण्ड, सिने लता परिसर, गांधी मार्केट या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. जंतुनाशक फवारे तसेच फॉगिंगही केले जात असल्याची माहिती डॉ. आजगावकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com