डेंगू-चिकनगुनियाच्या डासांचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केले 'नवे डास'

पावसाळा येताच सर्वांना डेंग्यूच्या साथीची भीती वाटू लागते. मात्र आता लवकरच लोकांना डेंग्यू आणि चिकनगुनियापासून दिलासा मिळणार आहे.
Dengue
Dengue Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळा येताच सर्वांना डेंग्यूच्या साथीची भीती वाटू लागते. मात्र आता लवकरच लोकांना डेंग्यू आणि चिकनगुनियापासून दिलासा मिळणार आहे. खरं तर शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' तयार केला जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) खास डास तयार केला आहे, ज्या अळ्यांपासून जन्माला येतात त्यांना त्यांचा कुठेही विषाणू नसतो. (Dengue and Chikungunya News)

Dengue
मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, या लोकांना मिळाले आमंत्रण

ICMR-VCRC चे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, वैज्ञानिकांनी एक विशेष प्रकारचा डास विकसित केला जो हळूहळू डेंग्यू आणि चिकनगुनियाचा नायनाट करणार आहे. ते म्हणाले की, 'आम्ही अशा मादी डासांना सोडू, जे नर डासांच्या संपर्कात येऊन अशा अळ्या तयार करतील, ज्यात हे विषाणू नसणार आहेत. आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत आणि ती कधीही सोडण्यात येऊ शकतात.

डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही

ICMR-VCRC येथील संशोधकांनी एडिस ऍप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत आणि या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी DNDI (Drugs for Neglected Diseases Initiative-(DNDI) इंडिया फाउंडेशन सोबत करार देखील केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Dengue
केजरीवालांची मोठी घोषणा! दिल्लीत होणार देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल

डेंग्यूची लक्षणे

भारतात पावसाळ्यात हा आजार झपाट्याने पसरत असतो तर यामध्ये ताप, अस्वस्थता, उलट्या आणि शरीरामध्ये तीव्र वेदना सुरू होतात. रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. कधीकधी रुग्णामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव देखील सुरू होतो. अशा स्थितीत अनेक अवयव काम करणे बंद करत असतात शेवटी रुग्णाचाही मृत्यू देखील होऊ शकतो.

उत्तर भारतात डेंग्यूचा कहर

उत्तर भारतामध्ये डेंग्यूचे प्रमाण खूप जास्त आहे तसेच देशाच्या राजधानीत या वर्षात आतापर्यंत डेंग्यूचे 150 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत जानेवारीमध्ये 23, फेब्रुवारीमध्ये 16, मार्चमध्ये 22, एप्रिलमध्ये 20 आणि मेमध्ये 30 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 जूनपर्यंत 15 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com