Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Pakistani Girl Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एका कार्यक्रमात स्टेजवर उभी राहून गाण्याचा कार्यक्रम सादर करत आहे.

Pakistani Girl Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Independence Day Viral Video: 14 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता, तेव्हा सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी तरुणी भारतीय गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या तरुणीची जोरदार खिल्ली उडवली आणि कमीतकमी आजच्या दिवशी तरी आपल्या देशाचे गाणे गायचे होते, असे म्हटले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

पाकिस्तानी तरुणीने गायले भारतीय गाणे

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एका कार्यक्रमात स्टेजवर उभी राहून गाण्याचा कार्यक्रम सादर करत आहे. यावेळी ती मोठ्या उत्साहात आणि मधुर आवाजात ‘सैयारा’ चित्रपटातील ‘सैयारा तू तो बदला नही है…’ हे टायटल सॉन्ग गात आहे. देशभक्तीपर गाणे गाण्याऐवजी भारतीय गाणे गायल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


Pakistani Girl Viral Video
Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

व्हिडिओ पाहून लोकांनी उडवली खिल्ली

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी या पाकिस्तानी तरुणीची जोरदार खिल्ली उडवली. एका युजरने तर जिन्नाची आठवण करुन दिली. म्हणाला, “जर आज जिन्ना जिवंत असते, तर त्यांनी या मुलीला विचारले असते की, मी यासाठीच तुमच्यासाठी वेगळा देश मिळवून दिला होता का?”

दुसऱ्या एका युजरने लिहिले, “लाज वाटू दे, कमीतकमी आजच्या दिवशी तरी आपल्या देशातील गायकांचे गाणे गायचे होते.” लोकांच्या या प्रतिक्रिया खूपच तिखट आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @jeejaji नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी लाईक केला आहे.


Pakistani Girl Viral Video
Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

‘सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रुठा हुआ है’ या गाण्याची निर्मिती तनिष्क बागची, फैहम अब्दुल्ला आणि अरसलान निजामी यांनी मिळून केली आहे, तर त्याचे नृत्य दिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. ही घटना सोशल मीडियाच्या जगात कोणत्याही गोष्टीला कसे व्हायरल करु शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध करते, पण त्याचबरोबर लोकांच्या भावना दुखावल्यास त्यातून वादही निर्माण होऊ शकतो हेही दाखवून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com