International Meditation Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Meditation: मन कंटाळून गेलं आहे का? 15 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रीत केल्याने मिळेल आराम

International Meditation Day: ध्यानधारणेत तुम्हाला खरोखर काही वेळ बाजूला काढून मन:शांतीसाठी प्रयत्न करावा लागतो

Akshata Chhatre

International Meditation Day 2024

आयुर्वेदात ध्यानधारणेला भरपूर महत्व दिलं गेलंय. मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी धान्यधारणा हा एक सोपा उपाय ठरतो. १९ डिसेंबर हा आंतराष्ट्रीय ध्यानधारणेचा दिवस आहे. मन अनेकवेळा विविध प्रश्नांशी दोन हात करत असतं आणि म्हणून त्याला काहीवेळ आरामाची गरज असते. हा आराम काही वेळ झोपून मिळतो का? तर नाही. रात्री झोपताना सुद्धा तुमचं मन अचेतन असतं, त्याचे विचार सुरूच असतात आणि म्हणून त्याला काहीवेळ खरोखर आराम करण्याची गरज असते. मग हा वेळ मनाला कसा द्याल? धानधारणा करून. तुम्ही जर का देवपूजा करता असताना काही वेळ डोळे मिटून शांत बसत असाल तर ठीक पण ध्यानधारणेत तुम्हाला खरोखर काही वेळ बाजूला काढून मन:शांतीसाठी प्रयत्न करावा लागतो.

असं म्हणतात ध्यान केल्याने मन शांत होतं. मनावरचं ओझं कमी व्हायला मदत मिळते. एकदाका मन शांत झालं म्हणजे तुम्ही नवीन विचार करू शकता. पण एक दिवशी ध्यान करून लगेच तुम्हाला बदल दिसून येणार नाहीत, यासाठी सातत्य महत्वाचं आहे. असं म्हणतात नियमित आठ आठवडे ध्यानधारणा केल्याने नक्कीच परिणाम दिसून येतो.

ध्यानधारणा केल्याने आपोआप हार्टबीट नॉर्मल होतात, ब्लड प्रेशर सुधारतं आणि तुम्ही निरोगी जीवन जगायला लागता. तुमच्या मनाला नेमकं काय वाटतंय, मन तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतंय हे ध्यानातून समजतं कारण तुम्ही यावेळी शांत बसून स्वतःला वेळ देत असता, स्वतःशी गप्पा करत असता, आणि स्वतःसोबत एकरूप होत असता.

तुम्ही ज्या वातावरणात जगात आहात त्याचा काळत नकळत तुमच्यावर परिणाम होतोय आणि तुमचं मन सुद्धा यामध्ये ओढलं जातंय. ध्यानधारणा करताना आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि आजूबाजूच्या गोष्टींचा आपोआप विसर पडतो, यामुळे तुम्ही अंतर्मनामध्ये डोकावता, मी काय विचार करतोय, मला काय वाटतंय, माझं मन दुखावलं आहे का याचा विचार केला जातो आणि आपोआप प्रश्नांची उत्तरं मिळून जातात. केवळ काहीवेळ श्वास आतबाहेर केल्याने मनावरचं ताण कमी होतो, त्यामुळे स्वतःसाठी किमान एवढं तरी नक्कीच करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! मालमत्ता ताब्यात येणार; 'या' राशींना मिळणार गोड बातमी

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

SCROLL FOR NEXT