Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips : 'हे' नियम पाळलेत तर तुमच्या घराची होईल भरभराट

जर वास्तुदोष असेल तर कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते आणि पैसा टिकत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

आपण सर्वजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमावतो. पण अनेक वेळा आपल्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही. याचा आपल्याला त्रास होतो. याशिवाय काही वेळा विनाकारण पैसेही खर्च होतात आणि आपण नशिबाला दोष देतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? जर वास्तुदोष असेल तर कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते आणि पैसा टिकत नाही. वास्तुशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती साधता येते. वास्तुचे कोणते नियम तुम्ही पाळल्याने तुमचे घर संपत्तीने भरले जाईल.

वास्तूचे हे नियम पाळा-

  • वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे. असे केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक लाभ होतो. तसेच जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल तर ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा. येथे पांढऱ्या रंगाचे स्फटिक ठेवा, यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे धन आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.

  • वास्तुशास्त्रानुसार विनाकारण नळ किंवा टाक्यांमधून पाणी वाहणे शुभ मानले जात नाही. वास्तूनुसार ज्या घरात असे घडते त्या घरात पैशाची कमतरता असते. याशिवाय अनावश्यक पैसा खर्च होतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या.

  • गुरु हा सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. कमकुवत ग्रह गुरूमुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बृहस्पति अनुकूल होण्यासाठी पोछा लावण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात भरभराट होईल.

  • वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला बसून भोजन करणे शुभ असते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि प्रगती होत नसेल तर घरातील काटेरी झाडे काढून टाका. तुमच्या घरात छोटी हिरवी रोपे लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्हाला संपत्ती मिळेल. तुमच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवा कारण घरात येणाऱ्या पैशाचा थेट संबंध असतो. हे स्वच्छ नसल्याने पैसे मिळण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो.

  • घरातील प्रार्थनास्थळाची खूप काळजी घ्यावी. जर तुमच्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर तुम्हाला पैशाशी संबंधित भयंकर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घराच्या ईशान्य कोपर्‍यात नेहमी पूजास्थान बनवावे. घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, त्यामुळे कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडावे, यामुळे संपत्ती वाढते.

  • वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुला वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. असे मानले जाते की ही वनस्पती ठेवल्याने घरात धनसंपत्ती वाढते. जर तुमच्या घरात पैसा स्थिर नसेल तर तुम्ही क्रॅसुला रोप देखील लावू शकता.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सामान्य लोकहित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT