Astrology: नववर्षात 'या' राशीच्या लोकांना साडेसातीपासून मिळेल मुक्ती

'साडेसाती' हे प्रत्येक राशीत शनीच्या भ्रमण कालावधीनुसार त्या-त्या राशीला मिळणारं फळ असतं.
Astrology
AstrologyDainik Gomantak
Published on
Updated on

शनीच्या परिवर्तनाचा सर्व राशींच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत असेल, या राशींना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनिदेव मकर राशीत भ्रमण करत होते. 17 जानेवारी 2023 रोजी ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल.

साडेसाती म्हणजे त्रास, अडचणी होणारच असा एक सार्वत्रिक समज आहे. कारण साडेसातीमध्ये शारीरिक, आर्थिक, सामाजिक पातळीवर कोणतंच काम संकटांविना पार पडत नाही. त्यामुळे साडेसाती सुरू झाली, की अनेक जण देवाचा धावा करू लागतात. खरं तर साडेसाती हे प्रत्येक राशीत शनीच्या भ्रमण कालावधीनुसार त्या त्या राशीला मिळणारं फळ असतं. साडेसातीमध्ये अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात. त्यांना अडीचकी म्हणतात. शनी देव (Shani Dev) हे न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देण्याचं काम ते करतात. त्यामुळेच चांगलं काम करणाऱ्यानं साडेसातीला घाबरण्याची गरज नसते, असं म्हणतात.

शनीची साडेसाती म्हणजे काय?
शनीची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालावधी. शनीला 12 राशींमधून प्रवास करण्यासाठी 30 वर्षे लागतात, म्हणजेच शनि एका राशीत अडीच वर्षे राहतात. "जेव्हा कुंडलीतील चंद्र राशीतून शनीचे संक्रमण 12व्या भावात सुरू होते, तेव्हापासून त्या राशीवर साडेसाती सुरू होते".

धनु : धनु राशीच्या लोकांना प्रदीर्घ काळानंतर शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्यांचे दुःख संपेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक तणाव आणि रोगापासून मुक्ती मिळेल. भाग्य तुमच्या सोबत राहील.

Astrology
Ayurvedic Medicine: थंडीच्या दिवसातील सर्दी-खोकल्याची समस्या करा दूर, 'हे' आहेत रामबाण उपाय

मिथुन : कुंभ राशीत शनीचे संक्रमण मिथुन राशीतील शनिचा प्रभाव संपवेल. त्यांना तणावातून आराम मिळेल. करिअरमध्ये चांगला काळ सुरू होईल.


तूळ राशी: 17 जानेवारीला तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल. त्यांचे थांबलेले काम आता सुरू होणार आहे. तणाव कमी होईल. मानसिक सुख-शांती मिळेल. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल.

Astrology
Bad Cholesterol Food : सावधान! या गोष्टी शरीरात वाढवतात कोलेस्टेरॉलचे प्रमाण; वेळीच करा बदल

शनीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी हे उपाय

शनि उपाय : पंचांगानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा वेळी शनीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी हे उपाय करा. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा आणि रुद्राक्ष जपमाळेने ओम शं शनैश्चराय नमः चा 108 वेळा जप करा. लोकांनी 11 शनिवारपर्यंत दान करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com